पक्क्या परवान्यासाठी मासिक दौऱ्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पक्क्या परवान्यासाठी 
मासिक दौऱ्याचे आयोजन
पक्क्या परवान्यासाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

पक्क्या परवान्यासाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ : पक्का परवाना (पक्की अनुज्ञप्ती) मिळण्यासाठी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (आरटीओ) येत्या जुलैमध्ये खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या परवान्याच्या चाचणीसाठी ४ व ५ जुलै रोजी खेड, ११ व १२ जुलै रोजी मंचर, १८ व १९ जुलै रोजी जुन्नर, २५ व २६ जुलै रोजी वडगाव मावळ आणि २९ जुलै रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन केले आहे. या परवान्यासाठी १ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता कोटा उपलब्ध होणार आहे. यासाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पूर्ववेळ घ्यावी लागणार आहे. अर्जदाराने परवान्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करून वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84831 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..