ट्रॅकिंग सिस्टीम कधी होणार कार्यान्वित? एसटी बस ः प्रणाली बसवूनही ॲपच्या उद्घाघाटनाला मुहूर्त मिळेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रॅकिंग सिस्टीम कधी होणार कार्यान्वित?
एसटी बस ः प्रणाली बसवूनही ॲपच्या उद्घाघाटनाला मुहूर्त मिळेना
ट्रॅकिंग सिस्टीम कधी होणार कार्यान्वित? एसटी बस ः प्रणाली बसवूनही ॲपच्या उद्घाघाटनाला मुहूर्त मिळेना

ट्रॅकिंग सिस्टीम कधी होणार कार्यान्वित? एसटी बस ः प्रणाली बसवूनही ॲपच्या उद्घाघाटनाला मुहूर्त मिळेना

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ ः प्रवासादरम्यान आपल्याला हवी असलेली एसटी नेमकी कुठे आहे ? कधीपर्यंत आपल्याला मिळेल ? या बाबत अनेकांना माहिती नसते. त्याची माहिती घरबसल्या मिळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून, बसगाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम प्रणाली बसवली. मात्र त्या ॲपचे उद्घाटन न झाल्याने अद्याप प्रवाशांना एसटी बसची माहिती घेण्यासाठी आगारातच जावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पिंपरी येथील वल्लभनगर आगारातील ५९ बस गाड्यांना ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम’ बसविण्यात आली आहे. प्रवाशांना घरबसल्या बसचे लोकेशन कळण्यासाठी मोठा गाजावाजा करूनही दोन वर्षांपूर्वीच ही यंत्रणा बसविण्यात आली. या आगारातून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आदींसह विविध मार्गावर बसच्या फेऱ्या होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ॲपचे उद्घाटन न झाल्याने प्रवाशांना लाभापासून वंचित राहावे लागले आहे. हे अॅप कार्यान्वित झाले नसल्याने प्रवाशांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दोनदा मुहूर्त हुकला
सध्या वल्लभनगर बस स्थानकांतर्गत ही प्रणाली कार्यान्वित आहे. मोठ्या स्क्रीनवर विविध मार्गावरील बसचे लोकेशन प्रवाशांना पाहायला मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण ॲप सिस्टिममुळे प्रवाशांना घरबसल्या बसचे लोकेशन कळणार आहे. त्यासाठी अॅपची निर्मितीदेखील केली आहे. त्याचे लॉचिंग करण्यात येणार होते. मात्र दोनदा मुहूर्त ठरूनही अद्याप त्याचे लॉंचिंग झाले नाही. वल्लभनगर आगारात मोठ्या टीव्ही स्क्रीनवर सध्या हे लोकेशन सुरु असल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, नागरिकांना आता त्यासाठी आपल्या हातातील कामे सोडून बस स्थानकात जावे लागेल, अशी परिस्थिती आहे.


योजनेचा उद्देश काय
‘लालपरी’ला व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसविल्याने प्रवाशांना घरबसल्या एसटी बसचे लोकेशन पाहता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेचे बचत होणार आहे. अॅपमुळे प्रवाशांना मोबाईलवर बस कुठे आहे, कुठल्या मार्गावर आहे. याचे लोकेशन क्षणात कळणार आहे.

कोट
या सिस्टिमबाबत आम्हाला तरी काही माहिती नाही. गेल्या अनेक वर्षांपासून वल्लभनगर आगारातून विविध मार्गावर प्रवास करत आहे. मात्र, आम्हाला बसची वाटच बघावी लागते. त्यामुळे नवीन प्रणाली बसवली असेल तर ती कुठे आहे ? हे अद्याप तरी माहिती नाही.
-संतोष पाटील, प्रवासी रहाटणी

कोट
आगाराच्या ५९ बस गाड्यांना दोन वर्षांपूर्वीच ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम’ बसविण्यात आली आहे. ॲपचे लॉचिंग नसल्याने सध्या बस स्थानकांतर्गत ही सुविधा सुरु आहे. मोठ्या स्क्रीनवर नागरिकांना आपली बस कुठे आहे हे पाहता येणार आहे. लवकरच ॲपचे लॉचिंग होऊन नागरिकांना वापरासाठी मिळेल.
--गोविंद जाधव, वल्लभनगर आगार प्रमुख

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85069 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top