संमतीचे फॉर्म विनाचर्चा झोपडीधारकांकडून भरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संमतीचे फॉर्म विनाचर्चा 
झोपडीधारकांकडून भरले
संमतीचे फॉर्म विनाचर्चा झोपडीधारकांकडून भरले

संमतीचे फॉर्म विनाचर्चा झोपडीधारकांकडून भरले

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० : आनंदनगरमधील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी विकसकांनी चर्चा न करता, संमतीचे फॉर्म भरून घेतले आहेत. त्यास सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे.
रेल्वेबाधित सर्वच झोपडपट्टीधारकांना पक्की घरे दिली जाणार आहेत. ही घरे साडेतीन ते चार हजार फूट आहेत का? तसेच, झोपडीधारकांची घरे उठविल्यास रेल्वे पुनर्वासियांची सोय कोठे केली जाणार आहे? यासाठी कोणते निकष लावले आहेत? किती मजले घरे असून, काय सुविधा दिल्या जाणार आहेत? यासाठी रेल्वे प्रशासन व झोपडीधारकांची पुनर्वसनास मान्यता असणे आवश्यक आहे. पुनर्वसनाची संपूर्ण कल्पना झोपडीधारकांना असावी, पैशाचे आमिष दाखवून फॉर्म भरू नयेत. सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची मागणी आरपीआयचे उपाध्यक्ष के. बुक्तर यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85418 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top