कानठळ्या बसवणारी वाहने रडारवर गेल्या दोन दिवसांत ३२ जणांवर गुन्हे दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कानठळ्या बसवणारी वाहने रडारवर
गेल्या दोन दिवसांत ३२ जणांवर गुन्हे दाखल
कानठळ्या बसवणारी वाहने रडारवर गेल्या दोन दिवसांत ३२ जणांवर गुन्हे दाखल

कानठळ्या बसवणारी वाहने रडारवर गेल्या दोन दिवसांत ३२ जणांवर गुन्हे दाखल

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० : सायलेन्सरमध्ये बदल करून, कानठळ्या बसवणारा आवाज काढणारे बुलेट चालक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत सुसाट वाहन चालविणारे पोलिसांच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येते. आयुक्तालयाच्या हद्दीत दोन दिवसात तब्बल २३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. यामध्ये दुचाकींचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, सायलेंसरमध्ये बदल करून सुसाट दुचाकी चालविणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे अक्षरशः कानठळ्या बसतात. ध्वनी प्रदूषण होत असून परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याबाबत चालकांना काही म्हटल्यास वादाचे प्रसंग निर्माण होतात. या आवाजामुळे शेजारील वाहन चालक घाबरून अपघाताच्याही घटना घडतात. दरम्यान, अशा बेशिस्त चालकांना वठणीवर आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेने मोहीम हाती घेतली आहे. आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलिस ठाण्यात दोन दिवसात तब्बल २३ जणांवर कारवाई करण्यात आली.
वाहन चालकांवर सार्वजनिक ठिकाणी उपद्रव, ध्वनी प्रदूषण, वाहनात बेकायदेशीरपणे बदल करणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव वाहन चालवणे या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत.

--------

दाखल झालेले गुन्हे
देहूरोड पोलिस ठाण्यात नागाराव पांडुरंग वाघदुरे (रा. पिंपळे-निलख), पिंटू सुभाष पवार ( रा. आनंदनगर, बिबवेवाडी), विशाल यशवंत इंगळे ( रा. मामुर्डी) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दिघी पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर शामराव लिपणे (रा. सिद्धेश्वर कॉलनी, केळगाव), मंगेश कैलास भिंगारे (रा. गणेश कॉलनी, भारतमातानगर, दिघी), कुणाल विजय शेळके (रा. गव्हाणे वस्ती, आदिनाथनगर, भोसरी), माणिक पवार (रा. वडमुखवाडी) यांच्यावर, चिंचवड ठाण्यात ऋषीकेश शामराव भिसे (रा. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड), अक्षय राजेश भालेराव (रा. सिद्धार्थनगर, रहाटणी), निगडी ठाण्यात राजेंद्र बाळू हाडमोडे (रा. शिवरायनगर, वाल्हेकरवाडी), अशोक अंबादास धोगंडे (रा. ट्रान्सपोर्टनगर, निगडी) यांच्यावर, भोसरी ठाण्यात आदित्य मोहन गावडे (रा. केशवनगर, चिंचवड), इमरान बल्लु शेख (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्यावर सांगवी ठाण्यात फारूख नजीर शेख (रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव), प्रमोद पांडुरंग काळे (रा. रावेत) यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात ओम बाळासाहेब शिळवणे ( रा. शेलारवाडी, ता. मावळ), वाकड ठाण्यात बलाल कय्यूम पटेल (रा. जय मल्हारनगर , थेरगाव), हिंजवडी ठाण्यात रोहित नाना पाटील (रा. रहाटणी), अशोक दिलीप भालशंकर (रा. शिवनेरीनगर, कोंढवा), भावेश गोपीचंद पाटील (रा. फेज १, हिंजवडी), आशुतोष धनंजय पवार (रा. भूमकर चौक, हिंजवडी) यांच्यावर, शुभम अरुण चांदणे (रा. आंबेठाण चौक, चाकण), शंकर विठ्ठल मुंगसे (रा. रासे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


----------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85622 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top