कायदा-सुव्यवस्थेसाठी फलक काढण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कायदा-सुव्यवस्थेसाठी
फलक काढण्याचे आदेश
कायदा-सुव्यवस्थेसाठी फलक काढण्याचे आदेश

कायदा-सुव्यवस्थेसाठी फलक काढण्याचे आदेश

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० ः शहरातील राजकीय फ्लेकस काही व्यक्तींकडून फाडण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून, त्यामुळे वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी अनधिकृत बॅनर, फ्लेकस, विद्युत पोलवरील किऑक्स काढून टाकण्याबाबत पोलिसांनी महापालिकेला पत्र दिले आहे. त्याची दखल घेऊन अनधिकृत जाहिरात फलक, विद्युत खांबांवरील किऑक्सवर तत्काळ कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिकेच्या जागेत अभिनंदन, वाढदिवस, सभारंभ, दहावा व इतर जाहिराती प्रसिद्धीसाठी तात्पुरत्या स्वरूपात ऑनलाइन परवाना दिला जातो. अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये विनापरवाना लावलेले बॅनर, फ्लेकस, किऑक्स सात दिवसांत काढावेत, असे आदेशात म्हटले आहे.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85659 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..