गुणवत्ता वाढीसाठी अभिनव उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुणवत्ता वाढीसाठी अभिनव उपक्रम
गुणवत्ता वाढीसाठी अभिनव उपक्रम

गुणवत्ता वाढीसाठी अभिनव उपक्रम

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १ ः मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाने संस्थांतर्गत चार हजार ५०० विद्यार्थ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेला अभिनव उपक्रम इतर शाळा आणि महाविद्यालयांसाठीही देण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे संचालक महेशभाई शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यातील न्यू समर्थ स्मार्ट स्कूलिंग संस्थेने त्यासाठी विनाशुल्क प्रशिक्षण सेवा दिली असून, त्यात इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतच्या अध्यापन करणाऱ्या १७५ शिक्षकांचा समावेश आहे. गुरुवारी या प्रशिक्षण उपक्रमाचा समारोप झाला. पत्रकार परिषदेस सोनबा गोपाळे, संस्थेचे सहसचिव नंदकुमार शेलार, विनायक अभ्यंकर, यादवेंद्र खळदे, मुख्याध्यापक कुटे आणि स्मार्ट स्कूलिंगचे व्यवस्थापकीय संचालक संजय देशमुख यांच्यासह संस्थेच्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित होते.

शासनाच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीदेखील शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या या उपक्रमास राज्यातील ग्रामीण भागात राबविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. देशमुख म्हणाले, की पारंपरिक शिक्षण पद्धतीतील सामाजिक मूल्यांना पुन्हा एकदा लागू करून शिक्षकांना अध्ययन आणि अध्यापनातील कौशल्ये प्रदान करणारा हा उपक्रम आहे. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक-विद्यार्थी-पालक आणि संस्थाचालक अशी एकत्रित जबाबदारी घेण्यासाठी नूतन संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, सचिव संतोष खांडगे यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त ठरेल. यावेळी देशमुख यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व मोबाईल इंटरनेटचा गैरवापर, विद्यार्थ्यांची अनुपस्थिती आणि पालकांचा हस्तक्षेप आदी विषयांचा गुणवत्ता वाढीवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा संदर्भ देत त्याचा दोष केवळ एकट्या शिक्षकावर टाकणे गैर आहे, असे सांगितले.

दरम्यान, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी भाषा प्रभुत्व, संवाद कौशल्य, ज्ञानविस्तार, स्मार्ट ड्रेसकोड, आकलन आणि अध्यापनातील सहजता, परीक्षा तंत्र, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मानसशास्त्र आदी विषयांवर प्रात्यक्षिकासह १७५ शिक्षकांना कौशल्यप्राप्तीचे प्रशिक्षण देण्यात आले.
PNE22S74761

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85768 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..