पालिकेतर्फे ७४५ जणांची हिमोग्लोबिन तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेतर्फे ७४५ जणांची हिमोग्लोबिन तपासणी
पालिकेतर्फे ७४५ जणांची हिमोग्लोबिन तपासणी

पालिकेतर्फे ७४५ जणांची हिमोग्लोबिन तपासणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः अॅनिमियामुक्त शहर अर्थात ‘मिशन अक्षय’ मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. त्याअंतर्गत महापालिका अधिकारी, कर्मचारी व कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर झाले. त्यात ४८० पुरुष व २६५ महिला, अशा सुमारे ७४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत हिमोग्लोबिन तपासणी केली. आयुक्त पाटील यांच्यासह अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. शैलजा भावसार, डॉ. सुनीता साळवे आदी उपस्थित होते. त्यांना जंतनाशक व प्रतिबंधात्मक गोळ्या दिल्या. १८५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस दिला. दरम्यान, महापालिकेचे सर्व दवाखाने व रुग्णालयांत मुले व महिलांना जंतनाशक व प्रतिबंधात्मक गोळ्या दिल्या जात आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85803 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top