पिंपळे सौदागर परिसरात मतदार यादीमध्ये त्रुटी हरकतींचा कालावधी वाढविण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळे सौदागर परिसरात
मतदार यादीमध्ये त्रुटी
हरकतींचा कालावधी वाढविण्याची मागणी
पिंपळे सौदागर परिसरात मतदार यादीमध्ये त्रुटी हरकतींचा कालावधी वाढविण्याची मागणी

पिंपळे सौदागर परिसरात मतदार यादीमध्ये त्रुटी हरकतींचा कालावधी वाढविण्याची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ : आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी निवडणूक विभागामार्फत प्रभागानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये त्रुटी आहेत. पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे गुरव, काळेवाडी या भागातील चार प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने त्याला हरकत घेण्याचा कालावधी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विनोद नढे व संतोष कोकणे यांनी केली आहे.
काटेवस्तीप्रभाग क्र. ४०, रहाटणी-रामनगर प्रभाग क्र. ३३, ज्योतीबानगर-तापकीरनगर प्रभाग क्र. ३२. जवळकरनगर-वैदूवस्ती प्रभाग क्र. ४१ या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतदारांच्या नावात तफावत आहे, अशी तक्रार नाना काटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की प्रभाग क्र. ४० मधील मतदारांचे नाव हे शेजारील प्रभाग क्र. ४१ व ३२ मध्ये दुसऱ्या प्रभागातील यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांना निवडणुकीच्या मतदानावेळी आपले नाव प्रभाग यादीमध्ये न सापडल्यास सदरचे मतदार हे मतदानापासून वंचित राहतील. याचा विचार करता प्रारूप मतदार यादीमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करून नवीन दुरुस्त मतदार यादी प्रसिद्ध करण्यात यावी.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85842 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top