वारस असल्याचे भासवून फसवणूक, एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारस असल्याचे भासवून 
फसवणूक, एकाला अटक
वारस असल्याचे भासवून फसवणूक, एकाला अटक

वारस असल्याचे भासवून फसवणूक, एकाला अटक

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : मृत व्यक्तीचा वारस असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर जागेचा बेकायदेशीररित्या व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिंचवडमधील उद्यमनगर येथे घडला.

याप्रकरणी चैतन्य श्रीराम संगमनेरकर (रा. कसबा पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल राघू शिंदे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचे वडील कै. श्रीराम संगमनेरकर यांनी १९७५ मध्ये उद्यमनगर येथील जागा खरेदी केली होती. दरम्यान, आरोपी अनिल याने संगमनेरकर यांचा वारस असल्याचे भासवले. त्यानंतर अनिल श्रीराम संगमनेरकर या नावाचे खोटे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार केले. त्याआधारे त्यास कोणतेही अधिकार नसताना आयुब शेख सोबत त्यांच्या मिळकतीबाबत साठे खत तयार करून बेकायदेशीर व्यवहार केला. त्यानंतर खोटेपणाने जागेचा ताबा हस्तांतरण केल्याचे दाखवून स्वतःच्या फायद्यासाठी त्यांची मिळकत हस्तगत करून फसवणूक केली. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n08295 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top