भोसरीत पीएमपीएमएल बसवर दगडफेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीत पीएमपीएमएल बसवर दगडफेक
भोसरीत पीएमपीएमएल बसवर दगडफेक

भोसरीत पीएमपीएमएल बसवर दगडफेक

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसला रस्त्यात अडवून बसवर दगडफेक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार भोसरी येथे घडला. याप्रकरणी गोरक्षनाथ दत्तात्रेय सोनार (रा. आर्यन सोसायटी, राजगुरुनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व वाहक संजय जाठोट हे भोसरीहून पुणे स्टेशनला बस घेऊन जात होते. दरम्यान, भोसरी-आळंदी रोडवरील बनाचा ओढा येथे आरोपीने बस थांबवून रस्ता अडवला. त्यानंतर बसच्या पुढील काचेवर दोन दगड मारले. यामध्ये बसचे नुकसान झाले. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n74978 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top