
अंतिम मतदार याद्यांची पालिकेकडून प्रसिद्ध नाही
अंतिम मतदार याद्यांची
पालिकेकडून प्रसिद्ध नाही
पिंपरी, ता. २१ ः महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी गुरुवारी (ता. २१) प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, सायंकाळी सात वाजेपर्यंत ती प्रसिद्ध झाली नव्हती. ‘इंटरनेटच्या तांत्रिक अडचणीमुळे मतदारयादी अपलोड करता आलेली नाही. त्याबाबतचे काम सुरू आहे,’ असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, मतदार यादी पाहण्यासाठी महापालिका व क्षेत्रीय कार्यालयांत गेलेल्या नागरिक, कार्यकर्ते व इच्छुकांचा हिरमोळ झाला.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर तब्बल आठ हजार ७०० हरकती व सूचना आल्या आहेत. त्यांचा निपटारा करून नऊ जुलै रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करायची होती. मात्र, पाऊस व हरकतींच्या जास्त संख्येमुळे अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यासाठी २१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार गुरुवारी (ता. २१) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणे आवश्यक होते. मात्र, सायंकाळी सात वाजेपर्यंत ती प्रसिद्ध झालेली नव्हती. तांत्रिक अडचणीमुळे मतदारयाद्या अपलोड करण्यास अडचणी येत आहेत. त्याबाबतचे काम सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.
असे आरोप, हरकती
प्रारूप मतदार यादी राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनुकूल असल्याचा आरोप झाला होता. तसेच, अनेक मतदारांची नावे शेजारच्या प्रभागांत समाविष्ट केल्याबाबतच्याही हरकती होत्या. त्यामुळे मतदार यांद्यांमध्ये घोळ असल्यामुळेच त्या प्रसिद्ध केल्या नसल्याची चर्चा होती.
प्रारुप यादीतील मतदार
एकूण ः १५,००,६९३
स्थलांतरीत, मयत ः १२,५६४
हक्क बजावणार ः १४,८८,१२९
पुरुष ः ८,००,३९४
महिला ः ६,८७,६४७
इतर ः ८८
---
Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85882 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..