
दुचारी वाहने चोरीचे प्रकार रोखण्याची मागणी
पिंपरी, ता. २२ : संत तुकारामनगर मधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व वायसीएम रुग्णालय रहिवाशी भागातून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नागरिकांना वाहने चोरीला जाण्याची धास्ती भरली आहे. रात्री घडणाऱ्या वाहन चोरीच्या घटना आता दिवसाढवळ्या देखील घडू लागल्या आहेत. या चोरीच्या दृष्टीने संवेदनशील असलेला परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली आणण्याची मागणी धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी पिंपरी-चिंचवड शहर पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ‘नागरिकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वेळीच या वाहनचोरीवर नियंत्रण आणावे. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय परिसर तसेच वायसीएम रुग्णालय परिसरातून व संत तुकारामनगर रहिवासी भागातून पार्किंगला लावलेली वाहने चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे, या घटना रोखून नागरिकांना दिलासा द्यावा.’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22n86060 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..