दुःख आले तरच सुखाची व्याख्या कळते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुःख आले तरच सुखाची व्याख्या कळते
दुःख आले तरच सुखाची व्याख्या कळते

दुःख आले तरच सुखाची व्याख्या कळते

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ ः ‘‘जीवन जगताना समाधानाला महत्त्वाचे मानले गेले आहे. आपल्याकडे असणाऱ्या सामग्रीत आपण सुखी असणे गरजेचे आहे. सुखानंतर दुःख, दिवसानंतर रात्र आणि उन्हानंतर सावली येते. हे अटळ सत्य आहे. सुखी व्यक्ती इतरांचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या गरजा व भौतिक सुविधांचा विचार करते. जीवनात केवळ सुख असून उपयोग नाही. तर त्या बरोबरीने दुःख असणे देखील गरजेचे आहे, त्यातूनच सुखाची खरी व्याख्या कळते,’’ असे विचार उपप्रवर्तिनी साध्वी सत्यसाधनाजी यांनी मांडले.
जैन चातुर्मासानिमित्त थेरगाव येथील श्री वर्धमान जैन श्रावक संघाच्यावतीने जैन स्थानकात उपप्रवर्तिनी साध्वी सत्यसाधनाजी यांचे प्रवचन सुरू आहे. त्या म्हणाल्या, ‘‘समाधान म्हणजे काय? आपल्याकडे असणाऱ्या वस्तू किंवा बाबींमध्ये सुख मानणे म्हणजे समाधान होय. जीवनात दुःख येणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड देण्याची आपली क्षमता तयार होते. त्याचबरोबर आपल्याला आपल्या वस्तूंची किंवा आपल्या नात्यांची किंमत कळते. आपली व्यक्ती कोण आहे तेही दुःख आल्याशिवाय कळत नाही. सुखामध्ये साथ देणारे नाते केव्हा दूर होते ते दुःख आल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे जीवन जगताना सुख आणि दुःखाचा तराजू सारखा असला पाहिजे.’’
साध्वी सत्यसाधनाजी म्हणाल्या, ‘‘प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरूचा आशीर्वाद जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो. गुरू या शब्दामध्ये खूप अर्थ दडलेला आहे. प्रत्येकाचे गुरू वेगवेगळे असू शकतात. मात्र, गुरू या शब्दाची व्याख्या एकच आहे. गुरू दोन प्रकारचे असू शकतात. गुरूच्या आदेशाने चालण्यासाठी सौभाग्य लागते. ज्यांच्या जीवनात गुरुविषयी समर्पणभाव असतो. ते खऱ्या अर्थाने गुरूकडून ज्ञान प्राप्ती करू शकतात. सदगुरूंचे जीवनात खूप महत्त्व आहे. ते महत्त्व जाणून आपण गुरुविषयी आदरभाव ठेवत त्यांनी सांगितलेल्या योग्य मार्गावरून वाटचाल करायला हवी. त्यामुळे आपल्या जीवनाला नवी दिशा मिळू शकेल.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22o07011 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..