टीडीआर वापराबाबतच्या धोरणाची अंमलबजावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीडीआर वापराबाबतच्या धोरणाची अंमलबजावणी
टीडीआर वापराबाबतच्या धोरणाची अंमलबजावणी

टीडीआर वापराबाबतच्या धोरणाची अंमलबजावणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः झोपडपट्टी विकास हस्तांतरण हक्क (स्लम टीडीआर) वापराबाबतचे तात्पुरते धोरण लागू करण्याचा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तीन महिन्यांपर्यंत हे धोरण अंमलात राहील. त्यानंतर हा आदेश रद्द होऊन व पूर्वीप्रमाणे टीडीआर वापराचे प्रमाण व नियम लागू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) डिसेंबर २०२० पासून लागू आहे. त्यानुसार सर्वसाधारण टीडीआर आणि किमान ३० ते ५० टक्के वापर बंधनकारक असे दोन प्रकारचे स्लम टीडीआर आहेत. महापालिका परिसरात स्लम टीडीआरची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे एकूण टीडीआर वापरण्यावर मर्यादा आल्या आहेत. क्रेडाई आणि पुणे मेट्रोने संकलित केलेल्या माहितीनुसार चालु प्रकल्पांसाठी एक लाख ७९ हजार ४९६ चौरस मीटर स्लम टीडीआर नजीकच्या भविष्यात लागणार आहे. मे व जूनमध्ये ४८ हजार ४०३ चौरस मीटर आणि जुलै ते मार्च २०२३ पर्यंत अंदाजे एक लाख ६१ हजार १३४ चौरस मीटर स्लम टीडीआर तयार होईल, असे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कळविले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22o15071 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..