विदेशी दारू वाहतूक प्रकरणी दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विदेशी दारू वाहतूक प्रकरणी दोघांना अटक
विदेशी दारू वाहतूक प्रकरणी दोघांना अटक

विदेशी दारू वाहतूक प्रकरणी दोघांना अटक

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १० ः दोन वाहनातून विदेशी दारु विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८७ लाख ७५ हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जयकिसान धीमाराम ढाका व सुजानाराम जियाराम बिष्णोई (दोघे रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वाहनातून विदेशी दारू विक्रीसाठी नेत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रविवारी पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा व सोमाटणे टोलनाक्याजवळ पोलिस निरीक्षक संजय सराफ, बी. एस. घुगे, एम. आर. राठोड, दीपक सुपे, स्वाती भरणे, भागवत राठोड, अक्षय मेहत्रे, राहुल जौंजाळ, रसूल काद्री, चंद्रकांत नाईक, सूरज घुले, मुकुंद पोटे यांच्या पथकांनी सापळा लावून संशयित दोन कंटेनर थांबवून चौकशी केली असता त्यात गोवाराज्य निर्मित व केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला दारूसाठा दिसून आला. पोलिसांनी कंटेनरसह दोन आरोपींना ताब्यात घेतले. कंटेनरमधील मालाची तपासणी केली असता त्यात ५९ लाख ६० हजार चारशे रुपये किमतीची दारू व वाहतूक करणारे दोन कंटेनर असा एकूण ८७ लाख ७५ हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22p16028 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top