प्यार से नही, बदनामीसे डर लगता है... सोशल मिडियावर छायाचित्रांचा गैरवापर केल्याने अनेकांची डोकेदुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्यार से नही, बदनामीसे डर लगता है...  
सोशल मिडियावर छायाचित्रांचा गैरवापर केल्याने अनेकांची डोकेदुखी
प्यार से नही, बदनामीसे डर लगता है... सोशल मिडियावर छायाचित्रांचा गैरवापर केल्याने अनेकांची डोकेदुखी

प्यार से नही, बदनामीसे डर लगता है... सोशल मिडियावर छायाचित्रांचा गैरवापर केल्याने अनेकांची डोकेदुखी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० : एका सोबत भांडण झाल्याने त्याने माझ्या फोटोत छेडछाड करून अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. यामुळे समाजात, नातेवाइकांत मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. घरातून बाहेर पडत नाही, तोंड दाखवायलाही जागा उरलेली नाही, काय करावे काहीच सुचत नाही, अशी स्थिती पंकज याची झाली आहे. असेच प्रसंग सध्या अनेकांवर ओढवत आहे. प्रेमभंगातून अशा घटना घडण्याचे प्रमाण मोठे आहे.

सध्या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने अधिकच सोपे झाले आहे. काही जण सोशल मीडियावर आपला फोटो ठेवतात. मात्र, त्याचाच गैरवापर करून त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. यातून संबंधित व्यक्तीची बदनामी होते. बदनामीसाठी हा नवा फंडा अवलंबला जात आहे. या बदनामीतून काही व्यक्ती टोकाचा निर्णय घेण्यापर्यंत पाऊल टाकतात. यातून अक्षरक्षः काही जणांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील सायबर सेलकडे या वर्षात अशा प्रकारच्या १९० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, समोरच्या व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त करण्याअगोदर असा उद्योग करणाऱ्यांनी भान ठेवणे गरजेचे आहे.
--------------
खुन्नस, वैयक्तिक वाद
सोशल मीडियावर अश्लील फोटो अपलोड करून बदनामी करण्याच्या प्रकारांत वाढ होत आहे. प्रेमास नकार दिल्याने अथवा एखादी खुन्नस काढण्यासाठी, वैयक्तिक वाद, जुने भांडण, बदनामी यासाठीही असे उद्योग प्रकार केले जात असल्याचे समोर येते. मात्र, संबंधित व्यक्तीला बदनामीला सामोरे जावे लागते. यामुळे सोशल मीडियावर आपले फोटो ठेवताना खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
--------------
बदनामी अधिक वेदनादायी
राग व्यक्त करण्यासाठी शिवीगाळ, मारहाण केली जाते. दुखापत केली जाते. असे अनेक प्रकार घडतात. मात्र, आता हा नवीन प्रकार समोर आला आहे. अश्लील फोटो अपलोड करून राग व्यक्त केला जात आहे. हल्ल्यातून शरीरावर होणाऱ्या जखमेच्या वेदनेपेक्षाही अशाप्रकाची बदनामी अधिक वेदनादायी असल्याचे पीडित व्यक्ती सांगतात.
--------------------
या वर्षीच्या तक्रारी...

जानेवारी ६०
फेब्रुवारी ६०
मार्च ३०
एप्रिल ४०
--------------------------

अश्लील मजकूर, फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यास कडक कायद्याची तरतूद आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी त्याचा गैरवापर करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारे गैरकृत्य करणाऱ्यांवर पोलिसांची बारीक नजर आहे.

- डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04406 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..