मानवी मूल्यांचे महत्त्व पसायदानातून अधोरेखित किसनमहाराज चौधरी यांचे प्रतिपादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानवी मूल्यांचे महत्त्व 
पसायदानातून अधोरेखित
किसनमहाराज चौधरी यांचे प्रतिपादन
मानवी मूल्यांचे महत्त्व पसायदानातून अधोरेखित किसनमहाराज चौधरी यांचे प्रतिपादन

मानवी मूल्यांचे महत्त्व पसायदानातून अधोरेखित किसनमहाराज चौधरी यांचे प्रतिपादन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ ः मानवी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे पसायदान हे नित्यनूतन आहे, असे प्रतिपादन किसनमहाराज चौधरी यांनी केले.
विरंगुळा केंद्र, चिंचवडगाव येथे ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत ‘पसायदान’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना किसनमहाराज चौधरी बोलत होते. माजी नगरसेवक सुरेश भोईर, नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रमेश इनामदार म्हणाले, ‘‘वासंतिक व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधन आणि करमणूक यांचा समन्वय साधण्याचे उद्दिष्ट आहे.’’ याप्रसंगी नारायण दिवेकर यांचा ज्ञानेश्वरीचा हस्तलिखित ग्रंथराज सिद्ध केल्याबद्दल आणि सुदाम गुरव यांचा वधू-वर मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला; तसेच मे महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.

चौधरी पुढे म्हणाले, ‘‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी!'' असे संतवचन आहे. उच्चवर्णीयांनी बहिष्कृत केल्यामुळे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही भावंडे पैठण येथे शुद्धिपत्र घेण्यासाठी गेले असताना वडीलबंधू अन् गुरू निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेनुसार ज्ञानेश्वरांनी सुमारे नऊ हजार ओव्यांचा भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कथन केल्यावर माउलींनी निवृत्तीनाथांकडे पसायदान मागितले. पसायदान म्हणजे एका संताने आपल्या गुरूंच्या माध्यमातून भगवंताकडे मागितलेला प्रसाद होता. अर्थातच स्वतःसाठी काहीही न मागता त्यांनी संपूर्ण विश्वाचे कल्याण व्हावे, असे दान मागितले. ’’

नंदकुमार मुरडे यांनी सूत्रसंचालन केले. हरिभाऊ क्षीरसागर यांनी आभार मानले. गोपाळ भसे, अरविंद जोशी, उषा गर्भे, जयमाला विभूते, चंद्रकांत पारखी, सुधाकर कुलकर्णी, सतीश कुलकर्णी, रत्नप्रभा खोत, मंगला दळवी, भिवा गावडे यांनी संयोजनात परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04522 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..