प्रभागरचनेचे नकाशे उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभागरचनेचे नकाशे उपलब्ध
प्रभागरचनेचे नकाशे उपलब्ध

प्रभागरचनेचे नकाशे उपलब्ध

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ ः अंतिम रचनेचे प्रभागनिहाय नकाशे महापालिका निवडणूक विभागाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. शिवाय महापालिका आणि क्षेत्रीय कार्यालय स्तरावरसुद्धा ते पाहायला मिळणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग लगेच कामाला लागला. १७ मेपर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर करणार होते. पण त्या अगोदरच महापालिकेची १३ मे रोजी प्रभागरचना जाहीर झाली. मात्र, प्रभागात बदल केल्याचे नकाश उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे नेमके प्रभाग कसे बदलले याची माहिती मिळत नव्हती. अधिसूचना वाचून बदल समजत नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. त्यात ३२ पैकी ८ प्रभागात बदल केले असल्याने ते बदल कसे आहेत याची उत्सुकता लागली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04668 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..