बूथ यंत्रणा सक्षमीकरणावर भर महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपची मोर्चेबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बूथ यंत्रणा सक्षमीकरणावर भर 
महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपची मोर्चेबांधणी
बूथ यंत्रणा सक्षमीकरणावर भर महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपची मोर्चेबांधणी

बूथ यंत्रणा सक्षमीकरणावर भर महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपची मोर्चेबांधणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पार्टीने जोरदार मोर्चेबांधणी केली असून, प्रदेश नेतृत्त्वाने स्थानिक राजकारणात लक्ष घातले आहे. विशेष म्हणजे, बूथ यंत्रणा सक्षमीकरणावर भर दिला असून, ‘यंदाचा निर्धार १०० पार’, असा संकल्प करण्यात आला आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत शहर कार्यकारिणीची शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर माई ढोरे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सदस्य अमर साबळे, सदाशिव खाडे, संतोष कलाटे, कायदा आघाडीचे प्रदेश सह संयोजक सचिन पटवर्धन, दक्षिण भारत आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘आगामी निवडणूक ही पक्षाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे. भाजप शहर कार्यकारिणीने बूथ यंत्रणा मजबूत करावी. केंद्र सरकार आणि राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोचली पाहिजे. या निवडणुकीसाठी इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना घराघरांत पोहोचवण्याची जबाबदारी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे.’’

येत्या ५ जूनला बैठक
पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीच्या कामकाजाचा आढावा आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक बांधणीबाबत येत्या ५ जून रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. त्या अनुषंगाने शहर कार्यकारिणी कामाला लागली आहे. शक्तीकेंद्र आणि यादी प्रमुखांपर्यंत सर्वांनी जबाबदारी विभागून घेतली आहे. सत्ताकाळात शहरात भाजपने केलेल्या विकासकामांची जागृती शहरातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, असेही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
फोटो ः 65729

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04671 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..