सुनेवर हल्ला करून सासऱ्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुनेवर हल्ला करून  
सासऱ्याची आत्महत्या
सुनेवर हल्ला करून सासऱ्याची आत्महत्या

सुनेवर हल्ला करून सासऱ्याची आत्महत्या

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : सुनेच्या डोक्यात हत्याराने मारहाण करून प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर सासऱ्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना थेरगाव येथे घडली.
सूर्यकांत मारुती वनवे (वय ७४, रा. सृष्टी निवास, बेलठीकानगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या सासऱ्याचे नाव आहे. वनवे यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांची सून गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याप्रकरणी सुशील सूर्यकांत वनवे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूर्यकांत हे त्यांचा मुलगा सुशील, पत्नी व सून यांच्यासह येथे एकत्र राहायचे. शुक्रवारी (ता. २०) दुपारी अडीचच्या सुमारास सूर्यकांत व त्यांची सून घरी होते. त्यावेळी त्यांनी कोणत्यातरी हत्याराने सुनेच्या डोक्यात मारहाण केली. याप्राणघातक हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर सूर्यकांत यांनी त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सुनेवर केलेल्या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04694 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..