‘प्लॅस्टिक कारवाईबाबत व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या’ - आयुक्त राजेश पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Patil
‘प्लॅस्टिक कारवाईबाबत व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या’ - आयुक्त राजेश पाटील

‘प्लॅस्टिक कारवाईबाबत व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या’ - आयुक्त राजेश पाटील

पिंपरी - प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदीच्या कारवाईबाबत व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केले आहे.

मनमानीपणे दंड आकारणी करून व्यापारी व प्रशासन अशी वादाची परिस्थिती करू नये, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात प्लॅस्टिक कॅरी बॅग वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे व्यापारी आणि प्रशासनातील कर्मचारी यांच्यामध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. प्रशासन अन्यायकारकपणे कारवाई करीत आहे, असा संदेश जनमानसात जात आहे. महापालिका प्रशासनाने प्लॅस्टिक विरोधी पथक तयार केले आहे. त्याद्वारे एकाच दुकानात १० ते १५ अधिकारी अचानक धाड टाकतात आणि कॅरी बॅगची तपासणी करतात.

व्यापाऱ्यांशी आणि दुकानातील कर्मचाऱ्यांशी अरेरावीने बोलतात, अशा तक्रारी आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाची भूमिका स्वागतार्ह आहे. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर दैनंदिन व्यापार आणि व्यवहारात बंद करावा, हा निर्णय सार्वजनिक लोकहिताचाच आहे.

मात्र, त्यासाठी व्यापारी आणि व्यावसायिकांना विश्वासात घेऊन कारवाईची भूमिका घ्यावी. प्लॅस्टिक कॅरी बॅग वापराच्या बंदीबाबत जनजागृती करावी. त्यांच्या उत्पादनावर बंदी आणावी. कापडी बॅग वापराबाबत जनजागृती करावी. दुकानदार, व्यावसायिकांना कापडी बॅग बंधनकारक करावी, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05117 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top