
पाळीव श्वान, मांजरांना उन बाधू देवू नका
पिंपरी, ता. २३ : कडाक्याच्या उन्हात आपल्या श्वानाची, मांजराची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यांचे घराबाहेर फिरणे, मोटारीत बसणे असो की पार्कमध्ये खेळणे शारीरिक तापमान नियंत्रित ठेवणे आंत्यतिक गरजेचे आहे. गरम हवेत हृदयाचे ठोके वाढून लाळ येण्याची शक्यता आहे. त्यासाठी, त्यांची राहण्याची जागा सावलीत आणि हवेशीर असायला हवे. त्यांना बोलता येत नसल्याने आपणच त्यांच्या भावना ओळखून त्यांचे संरक्षण करायला हवे, असा सल्ला पशुचिकित्सकांचा आहे.
१. शक्यतो त्यांना घरामध्ये ठेवा. भरपूर ताजे आणि स्वच्छ पाणी द्या. थंड आणि कोरड्या जागी आराम करू द्या.
२. मोटारीतील प्रवासानेही त्यांना उष्माघात आणि गुदमरल्यासारखे होऊ शकते. त्यामुळे सोबत पाणी असायलाच हवे.
३. मे महिन्याच्या मध्यापर्यंत आणि ऑगस्टच्या मध्यापासून नोव्हेंबरपर्यंत गोचीड सर्वांत जास्त सक्रिय असतात. त्यासाठी अँटी-टिक स्प्रे सोबत ठेवा.
४. गरम रस्त्यांमुळे पंजांना इजा होवू शकतेच शिवाय शरीराचे तापमान देखील वाढवू शकते. त्यामुळे, त्यांचे पंजे नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
५. आराम मिळण्यासाठी मालिश करा. थोडेफार केस कापा, त्यामुळे, शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल.
६. आहारात टरबूज, केळी, काकडी हे उत्तम पदार्थ आहेत. आइस्क्रीम आणि चॉकलेट्स वर्ज्य करा. मीठ आणि साखर असलेली उत्पादने टाळा. त्यामुळे निर्जलीकरण होणार नाही. गरम अन्न देऊ नका.
----
श्वान दोन महिन्याचे झाल्यावर ९ इन १ किंवा ११ इन एकचे लसीकरण करून घ्या. तसेच पिल्लू तीन महिने झाल्यानंतर अँटी रेबिज लस टोचून घ्यावे. दर तीन महिन्यांच्या अंतराने निर्जंतुकीकरण म्हणजेच जंतांचे डोस द्यावे. मांजराला तीन महिने झाल्यानंतर लस द्यावी. तसेच, ट्रीकॅट लस वर्षातून द्यावी. ओआरएस व इलेक्ट्रॉल पावडर डिहायड्रेशनसाठी द्या. जेवणात दही व ताक भाताचा समावेश करा. इतर जेवण कोमट पाण्यात भिजून द्यावे.
- घनश्याम पवार, पशुचिकित्सक
---
पाळीव प्राण्याला निर्जलीकरणाची किंवा जास्त लाळ आणि धडधडण्याची किंवा ताप, उलटीची कोणतीही चिन्हे दिसल्यास पशुवैद्याशी संपर्क साधा. या दिवसात थोडे जरी दुर्लक्ष झाल्यास घातक ठरु शकते. उन्हाळा कठीण असला तरी थोडीशी काळजी आणि लक्ष देणे आवश्यक आहे. लहान मुलांप्रमाणेच त्यांची काळजी घ्या. त्यांना खूप उष्णता आणि इतर उन्हाळ्याच्या धोक्यांपासून वाचवा.
- अभिजित पाटील, श्वान प्रशिक्षक आणि मानसशास्त्र अभ्यासक
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05166 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..