खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर बॅडमिंटनसाठी पुन्हा मैदानात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर 
बॅडमिंटनसाठी पुन्हा मैदानात
खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर बॅडमिंटनसाठी पुन्हा मैदानात

खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर बॅडमिंटनसाठी पुन्हा मैदानात

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ : वाढत्या वयानुसार आणि नियमित बॅडमिंटन खेळल्यामुळे नागपूर या ठिकाणी राहणारे शरद महाजन यांचे उजव्या खांद्याचे हाड वाढले होते. त्यामुळे, खांदा वारंवार दुखत होता. बऱ्याच तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून देखील सुधारणा होत नव्हती. शेवटी, नातेवाइकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार डॉ. अपूर्व पटवर्धन यांच्याकडे धनश्री हॉस्पिटल, चिंचवड येथे उपचार घेतले. यशस्वी दुर्बीण शस्त्रक्रियेनंतर त्यांनी चंदीगढ या ठिकाणी झालेली ऑल इंडिया मास्टर्स बॅडमिंटन टुर्नामेंट चॅम्पियनशिपची स्पर्धा २०२२ मध्ये जिंकली.

डॉ. पटवर्धन यांनी पूर्ण तपासणीनंतर सुरवातीला खांद्यात इंजेक्शन दिले. त्यामुळे, खांद्याचे दुखणे पूर्णपणे बरे झाले. त्यानंतर, महाजन बॅडमिंटन खेळू लागले. पण, त्यानंतर पुन्हा मे २०१९ मध्ये गोवा येथील नॅशनल चॅम्पियनशिपची स्पर्धा खेळताना खांद्याला एकदम झटका बसला. त्यामुळे, ती जिंकत असलेली मॅच ते हरले. वयाच्या ६५ व्या वर्षी पुन्हा ते कधी खेळू शकेल, असे वाटत नव्हते. झोपेतही खांदा दुखत होता. बॅडमिंटन खेळणे तर दूरच पण, बॅडमिंटनचे रॅकेटही हातात धरता येत नव्हते.

त्यानंतर डॉ. पटवर्धन यांच्याकडे उपचारासाठी संपर्क साधला. संपूर्ण तपासणीनंतर एमआरआय रिपोर्टनंतर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे निश्चित झाले. १६ जून २०१९ मध्ये दीड तासाची खांद्याची शस्त्रक्रिया पार पडली. १८ जूनला त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यापुढे काही महिने त्यांनी व्यायाम केला. औषधोपचार घेतले. परिणामी, सहा महिन्यानंतर बॅडमिंटन खेळण्यासाठी महाजन मैदानावर उतरले.
फोटो ः 66340

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05538 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top