
बचतगटांच्या अनुदानात महापालिकेकडून वाढ
पिंपरी, ता. २४ ः महापालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यात महिलांना उद्योग व्यवसाय करता यावा, यासाठी बचतगटांना अनुदान देण्यात येते. यापूर्वी दोन वर्ष झाल्यावर २० हजार रुपये व १० वर्षे झाल्यावर २५ हजार रुपयांचे अनुदान मिळत होते. मात्र, व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरवातीच्या काळात आर्थिक मदतीची गरज असते. हे ओळखून योजनेत बदल करण्यात आला आहे.
बचतगटांना प्रोत्साहन मिळावे व उद्योग सुरू करता यावा, यासाठी बचतगटांच्या स्थापनेनंतर सहा महिने पूर्ण झाल्यावर १५ हजार रुपये व २ वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा १५ हजार रुपये असे दोन वर्षांत ३० हजार रुपये मानधन मिळणार आहे. महिलांनी बचतगटांची स्थापना करून उद्योग सुरू करावेत, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी सन २००० मध्ये ही योजना सुरू केली. गेल्या २२ वर्षांत समाज विकास विभागाकडे १८६५७ बचत गटांची नोंद आहे. आता महापालिकेने कालावधीची अटही शिथिल करण्याबरोबरच अनुदानातही वाढ केली आहे.
कोट
बचतगटांना दोन वेळाच अनुदान मिळते. पूर्वी बचतगटांची स्थापना झाल्यानंतर २ वर्षांनी व स्थानंतर १० वर्षे पूर्ण झाल्यावर अनुदान मिळत होते. मात्र, आर्थिक अडचणींअभावी बचतगटांना व्यवसाय बंद करण्याची वेळ येते. तसेच १० वर्ष बचतगट अनेकदा राहत नाहीत. सुरवातीला आर्थिक गरज भासते. त्यामुळे अनुदान योजनेत बदल केला आहे.
-सुहास बहाद्दरपुरे, समाज विकास अधिकारी, महापालिका.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05603 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..