
इंद्रायणीनगर प्रभागरचनेवर आक्षेप; आज सुनावणी
पिंपरी, ता. २४ ः महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप झाला आहे, त्या विरोधात भाजपकडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या याचिकेवर बुधवारी (ता. २५) सुनावणी होणार आहे.
भोसरी- इंद्रायणीनगर प्रभाग आठचे सेक्टर एक, गवळीमाथा, बाकी सर्व भाग असे तीन तुकड्यात विभाजन केले. सेक्टर दोनचाही संपूर्ण भाग वगळून नवीन भाग विठ्ठलनगर, लांडेवाडी झोपडपट्टी प्रभागाला जोडली. त्याबाबत प्रारूप प्रभागरचनेवर हरकत नोंदविली. त्याची दखल घेतली नाही. यावरून महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि त्यांच्या यंत्रणेने दबावाखाली प्रभाग रचना केल्याचे स्पष्ट होत आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे प्रभागांची मोडतोड केली. तक्रार करूनही दखल न घेतल्याने उच्च न्यायालयात दाद मागितल्याचे मडिगेरी यांनी सांगितले. प्रारूपनंतर आरक्षण बदलण्याची तरतूद नियमात नाही. प्रभाग दोनमध्ये एससी आरक्षण नव्हते. त्यासाठी सरासरीपेक्षा १० टक्के कमी म्हणजे ३३ हजार ५५९ लोकसंख्या अपेक्षित आहे. परंतु, एक हजार ३९८ ने लोकसंख्या कमी अर्थात ३२ हजार १६१ लोकसंख्या असूनही आरक्षण बदल केले आहे. प्रभाग पाच मध्ये एसटी आरक्षण होते. ते काढण्यासाठी पाच हजार १५४ लोकसंख्या काढून प्रभाग सात मध्ये टाकली आहे. त्यामुळे सातची लोकसंख्या सरासरी १० टक्के पेक्षाही जास्त म्हणजे ४१ हजार ०१७ अपेक्षित आहे. त्यात एक हजार २३४ ने वाढली आहे. ४२ हजार २५१ लोकसंख्या झाली आहे, असा आक्षेप मडिगेरी यांनी घेतला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05742 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..