सदनिकेचा स्वहिस्सा भरण्यासाठी लाभार्थींना ३१ मेपर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदनिकेचा स्वहिस्सा भरण्यासाठी
लाभार्थींना ३१ मेपर्यंत मुदतवाढ
सदनिकेचा स्वहिस्सा भरण्यासाठी लाभार्थींना ३१ मेपर्यंत मुदतवाढ

सदनिकेचा स्वहिस्सा भरण्यासाठी लाभार्थींना ३१ मेपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने शहरात पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. त्यातील सदनिकांसाठी सोडत काढली आहे. त्यात पात्र ठरलेल्या लाभार्थींना स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत चऱ्होली व मोशीतील बोऱ्हाडेवाडी प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यात अनुक्रमे एक हजार ४४२ आणि एक हजार २८८ अशा दोन हजार ७३० सदनिका आहेत. त्यातील लाभार्थींची सोडत काढण्यात आली आहे. सदनिका मिळालेल्या लाभार्थींसह प्रतिक्षा यादीही तयार आहे. लाभार्थी ठरलेल्या व प्रथम स्वहिस्सा रक्कम भरलेल्या चऱ्होली प्रकल्पातील लाभार्थ्यांना पुढील ४० टक्के आणि बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना ८० टक्के स्वहिस्सा रक्कम भरायची आहे. त्यासाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत लाभार्थ्यांनी स्वहिस्सा रक्कम महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागामध्ये चलन प्राप्त करून भरावी अन्यथा लाभ रद्द करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त बोदडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. सोडतीची माहिती व निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग, २०५ व्यापारी संकुलन, भाजी मंडई शेजारी, चाफेकर चौक, चिंचवडगाव, पुणे येथील कार्यालयात सूचना फलकावर व महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05959 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top