
‘अण्णासाहेब मगर स्टेडिअम खुले करा’
पिंपरी, ता. २५ : नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअम कोरोनाकाळात दोन वर्ष बंद होते. त्यानंतर, त्या जागेवरील कोविड सेंटर काढले. परंतु, खेळाडूसाठी हे सेंटर अद्यापपर्यंत खुले करण्यात आलेले नाही. तसेच, सकाळच्यावेळी नेहरूनगर, विठ्ठल नगर, संत तुकाराम नगर, अजमेरा कॉलनी, अंतरिक्षा कॉलनी, मनीष गार्डन, यशवंत नगर अशा ठिकाणांहून नागरिक जॉगिंगसाठी या ठिकाणी येतात. अद्यापपर्यंत या मैदानावरील राडारोडा उचलला नाही. तसेच, या परिसरातील जलतरण तलावही अद्यापपर्यंत बंद आहेत. परिणामी, नागरिक महापालिका कारभारावर नाराज आहेत. या सर्व समस्या सोडविण्याची मागणी भिमशाही युवा मंचचे संस्थापक शिवशंकर उबाळे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर उपाध्यक्ष अशोक बनसोडे, नितीन कसबे, शंकर कदम, आकाश कांबळे, दत्ता ढोबळे, मोतीराव राव, शांताराम खुडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06139 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..