माणसांच्या कर्मावरच भाग्य ठरते ः वाडेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणसांच्या कर्मावरच भाग्य ठरते ः वाडेकर
माणसांच्या कर्मावरच भाग्य ठरते ः वाडेकर

माणसांच्या कर्मावरच भाग्य ठरते ः वाडेकर

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ ः ‘‘माणूस जसे कर्म करतो, तसे भाग्य त्याच्या वाट्याला येते,’’ असे प्रतिपादन ब्रह्मकुमारी ज्योती वाडेकर यांनी केले.

पिंपरी-चिंचवड निवृत्त संघटनेच्या चिंचवड शाखेतर्फे सभासदांच्या वाढदिवसानिमित्त विरंगुळा केंद्रात आयोजित सत्कार व प्रवचनपुष्प सादर करताना वाडेकर बोलत होत्या. शाखाध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, सुहास संगम, प्रकाश चव्हाण, अनुराधा रुकडीकर आदी उपस्थित होते.

सामुदायिक राष्ट्रगीताने आणि दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मे महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचा सत्कार केला. वाडेकर म्हणाल्या, ‘‘शारीरिक, आर्थिक स्वातंत्र्याइतकेच भावनिक स्वातंत्र्य खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही वैचारिक कार्याचा प्रारंभ करताना आधी मनाला शांत करा; कारण मानवी मन हे एखाद्या अवखळ बालकासारखे चंचल असते. शरीराला एखाद्या वस्तूप्रमाणेच आपण ते माझे आहे, असे समजतो. वास्तविक शरिरात आत्मा अस्तित्वात असेपर्यंत शरीर चैतन्यशील असते. चैतन्यरूपी ऊर्जा कधीही नष्ट होत नाही. माणसाची सत्कृत्य व दुष्कृत्यांची जबाबदारी सर्वस्वी त्याचीच असते. त्यामुळे सुख, दु:ख, भोग, पीडा यासाठी दुसऱ्याला दोष देऊ नका. अपेक्षारहित कर्म करून दुसऱ्याला सन्मान, आनंद दिल्याने विलक्षण समाधानाची अनुभूती येईल. मनातील विचारांनी आपल्या कर्माची सुरुवात होते. त्यामुळे स्वच्छ, निरिच्छ मनाने कर्म करीत राहिल्यास तसेच भाग्य तुमच्या वाट्याला येईल.’’ गंगाधर जोशी, श्रीकांत पानसे, मोरेश्वर देशपांडे, राजेंद्र भागवत, जयश्री गोवंडे यांनी संयोजन केले. नामदेव तारू यांनी सूत्रसंचालन केले. दीपक रांगणेकर यांनी आभार मानले. सामुदायिक ‘वंदे मातरम’ने सांगता झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06742 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top