
मोशी, वाकडमध्ये प्लॉगेथॉन; प्लॅस्टिक कचरा संकलन
पिंपरी, ता. २७ ः महापालिकेच्या ‘प्लॉस्टिकमुक्त पिंपरी-चिंचवड’ मोहिमेंतंर्गत ‘क’ आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात शुक्रवारी प्लॉगेथॉन मोहीम राबविण्यात आली. एकदाच वापरात येणारे प्लॉस्टिक न वापरण्याची आणि शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची शपथ घेण्यात आली. वाकड येथील मोहिमेत बेसिक्स संस्थेने जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले.
महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक रवीकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, सहायक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे, सतीश पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, आरोग्य विभागाचे कर्मचारी, डिव्हाईन व बेसिक्स संस्थांचे स्वयंसेवक, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर, दुर्गा ब्रिगेडच्या अध्यक्षा दुर्गा भोर आदी सहभागी झाले होते. प्लॉस्टिकमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. भारत माता चौक ते मोशी टोल नाका, अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते वखार महामंडळ, आरटीओ रस्ता, टाटा मटेरिअल गेट ते वेअर हाऊस रस्ता, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत वाकड ब्रिज ते हॉटेल टीप-टॉपपर्यंतच्या सेवारस्ता या भागात प्लॉगेथॉन मोहीम राबवून प्लॉस्टिक कचरा संकलित केला.
आज, उद्याही मोहीम
शनिवारी (ता. २८) ‘ई’ व ‘फ’ आणि रविवारी (ता. २९) ‘ग’ व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्लॉगेथॉन मोहीम राबविण्यात येणार आहे. चार जून रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत ‘रिव्हर प्लॉगेथॉन’ मोहीम राबविण्यात येणार आहे. पवना नदीमध्ये सांगवडे-किवळे ते संगम, मुळा नदीमध्ये वाकड ते संगम आणि इंद्रायणी नदीमध्ये तळवडे ते चऱ्होली येथे रिव्हर प्लॉगेथॉन मोहीम आयोजित केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06872 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..