
अवतीभवती
महापालिकेतर्फे सावरकर यांना अभिवादन
पिंपरी ः महानपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, कर्मचारी वासीम कुरेशी, दीपक पवार, संदीप बहिरट, शीतल पवार, मारुती मारणे, मानसिंग गायकवाड, हेमा शिंदे, अनिल घाडगे, सुरेश मोरे, लक्ष्मण तितकारे, दिलीप गावडे, पत्रकार प्रमोद गरड आदी उपस्थित होते.
--
शहर भाजपतर्फे पुष्पांजली
पिंपरी ः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी भाजपतर्फे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, अजय पाताडे, सलीम शिकलगार, शहर चिटणीस आशा काळे, देवदत्त लांडे, सुभाष सरोदे, निकीता गोसावी, मुकेश चुडासामा, अजित कुलथे, सुधीरकुमार अगरवाल, नेताजी शिंदे, संतोष रणसिंग, विजय वाघमारे, यशवंत दानवे, प्रसेन अष्टेकर आदी उपस्थित होते.
--
‘प्लॉगेथॉन’मध्ये तृतीयपंथींचा सहभाग
पिंपरी ः फ आणि इ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात आज प्लॉगेथॉन मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांसह तृतीयपंथीयांचा उत्स्फूर्त सहभाग हे मोहिमेचे वैशिष्ट्ये होते. फ कार्यालयाच्या हद्दीत प्रभाग क्रमांक १३ मध्ये यमुनानगर रुग्णालय ते महादेव मंदिर या रस्त्यालगतचा प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. इ कार्यालयाच्या हद्दीत प्रभाग तीनमध्ये मोशी चौक ते वहिलेनगर, प्रभाग चारमध्ये मॅगझीन चौक ते बोपखेल फाटा, प्रभाग पाचमध्ये मयूरी पॅलेस मागील मैदान, आणि प्रभाग सातमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंत मोहीम राबविली.
--
नालेसफाईचे काम जवळपास पूर्ण
पिंपरी ः महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रशासक राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नाले सफाईविषयी आढावा बैठक घेण्यात आली. नालेसफाईचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिली. उर्वरित काम युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे आदेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, सहशहर अभियंता रामदास तांबे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, सीताराम बहुरे, विजयकुमार थोरात उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07199 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..