बैलगाडा शर्यतीची परदेशी प्रेक्षकांनाही भुरळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बैलगाडा शर्यतीची 
परदेशी प्रेक्षकांनाही भुरळ
बैलगाडा शर्यतीची परदेशी प्रेक्षकांनाही भुरळ

बैलगाडा शर्यतीची परदेशी प्रेक्षकांनाही भुरळ

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ : चिखलीतील बैलगाडा शर्यतीला शनिवारी (ता. २८) उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्राचा हा रांगडा खेळ पाहण्यासाठी विदेशी प्रेक्षकांनी हजेरी लावली. नेदरलँडमधील तीन प्रेक्षकांनी घाटात उपस्थित राहून, बैलागाडा शर्यतींचा थरार अनुभवला.
भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आणि माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्या नियोजनातून बैलगाडा शर्यत टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर सुरू आहे. या शर्यतींचे संयोजन जय हनुमान बैलगाडा मंडळ, राहुलदादा जाधव बैलगाडा मंडळाने केले आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बैलगाडा शौकिनांसह सर्वसामान्य नागरिकांनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. चाकण औद्योगिक पट्ट्यातील ‘जीकेएन एरोस्पेस’ कंपनीचे संचालक असलेली तीन विदेशी नागरिक बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहिले. मार्टिन दुर्विले, जोस्ट दुर्विले आणि युस्ट कम्पहुइस अशी तिघांची नावे आहेत. महाराष्ट्रीय फेटा बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले. पाहुण्यांना वाजत-गाजत घाटात आणण्यात आले, अशी माहिती जय हनुमान बैलगाडा मंडळ व उत्सव समितीचे अध्यक्ष हनुमंत जाधव यांनी दिली.

भारतीय संस्कृती भावते : दुर्विले
मार्टिन दुर्विले म्हणाले, ‘‘एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी बैलगाडा शर्यत मी प्रथमच अनुभवत आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी आमचा सन्मान केला. या सन्मानाने आम्ही भारावून गेलो. इथली संस्कृती आम्हाला भावते. बैलांप्रति इथल्या लोकांना असलेला जिव्हाळा कौतुकास्पद आहे.’’
फोटो ः 67351

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07251 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top