
पवनमावळात बिजप्रक्रिया प्रशिक्षण शिबिराला प्रतिसाद
सोमाटणे, ता. ३० : बियाणांची उगवण क्षमतेत वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने पवनमावळ पूर्व भागातील शेतकऱ्यांचे प्रात्याक्षीकासंह बीज प्रक्रिया प्रशिक्षण शिबिर नुकतेच पाचाणे, पुसाणे, कुसगाव या तीन गावात घेतले. कुसगाव येथील शिबिरात प्रगतशील शेतकरी बाळासाहेब गायकवाड, मनोहर गायकवाड यांच्या शेतावर तर पाचाणे येथील प्रगतशील शेतकरी सोमनाथ शिंदे, सागर शिंदे, माधुरी शिंदे यांच्या शेतावर घेतले. या शिबिरात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. कृषी सहायक स्मिता कानडे, कृषी पर्यवेक्षक नंदकुमार साबळे, मंडल कृषी अधिकारी दत्ता शेटे यांच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना भात व सोयाबीन पिकासाठी लागणारे औषध देण्यात आले. बिजप्रक्रियेमुळे जमिनीतून पिकावर पसरणाऱ्या रोगावर नियंत्रण ठेवता येते, उगवण क्षमता वाढते, रोपाची जलद वाढ होते, रोपे निरोगी राहतात व उत्पन्नात दुपटीने वाढते, असे मत कृषी सहाय्यक स्मिता कानडे यांनी शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07614 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..