फसवणूकप्रकरणी दोन जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूकप्रकरणी 
दोन जणांवर गुन्हा
फसवणूकप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

फसवणूकप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० : कमी किमतीत फ्लॅट देतो, असे सांगून पैसे घेतले. मात्र, नंतर फ्लॅटचे खरेदीखत न करता व पैसेही परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येथे घडला.

या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल जयप्रकाश गायकवाड (रा. ओंकार रेसिडेन्सी, पिंपळे गुरव) याच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी त्यांचा बांधकाम व्यवसाय असल्याचे सांगत पिंपळे गुरव येथील मोरया गल्ली येथे साई लक्ष्मी व लक्ष्मी नारायण अशा दोन स्कीमचे बांधकाम सुरु असल्याचे सांगितले. तुम्ही लगेच पैसे दिले तर मी तुम्हाला कमी किमतीत फ्लॅट देतो, असे फिर्यादीला सांगून वेळोवेळी रोख व धनादेशाद्वारे फिर्यादीकडून वीस लाख रुपये घेतले. मात्र, अद्यापपर्यंत फ्लॅटचे खरेदीखत करून दिले नाही. अथवा फिर्यादीने दिलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. तसेच सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून दिलेले वीस लाखांचा धनादेश बाउंस केला. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07912 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top