विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहितेच्या छळप्रकरणी
सासरच्यांवर गुन्हा दाखल
विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल

विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती महातेंश बिक्कनवार (वय ३२), नंदावा नागराज परिसवा (वय ४२), नणंद व सासू (सर्व रा. मालमाडी, धारवाड, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. आरोपी पतीने पत्नीशी वारंवार भांडण करीत मारहाण व शिवीगाळ केली. पतीने स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक त्रास दिला. फिर्यादीच्या वागण्यावरून वारंवार टोमणे मारून मानसिक त्रास दिला. यास फिर्यादीची नणंद, नंदावा व सासू यांनी प्रोत्साहन दिले. तसेच फिर्यादी हे चिंचवड येथे माहेरी आल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना वारंवार फोन करून शिवीगाळ केली.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r65850 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..