विजेच्या कडकडाटासह पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या कडकडाटासह 
पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस
विजेच्या कडकडाटासह पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस

विजेच्या कडकडाटासह पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात रविवारी (ता. ११) सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरवासियांची तारांबळ उडाली.
दिवसभर कडाक्याचे ऊन होते. मात्र, सायंकाळी सहानंतर ढग दाटून येऊ लागले. त्यानंतर विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी, मोशी, चिखली, वाकड, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख आदी भागात जोरदार पाऊस बरसला. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर, रस्त्यावरील खड्ड्यात साठलेले पाणी, निसरडे रस्ते यामुळे अनेक मार्गावरील वाहतूकही मंदावली होती. यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली.
पावसापासून बचाव करण्यासाठी काहींनी रस्त्यालगतच्या झाडांचा आधार घेतला. निगडी ते दापोडी ग्रेडसेप्रेटरमधील पुलाखालीही वाहनचालक थांबले होते. निगडीतील टिळक चौक, आकुर्डी, काळभोरनगर येथील भुयारी मार्ग, मोरवाडी ते चिंचवड स्टेशन मार्गावरील सेवा रस्ता आदी ठिकणी पाणी साचले होते.
रविवारच्या सुटीमुळे सायंकाळी अनेकजण कुटुंबासह खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. यामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, सांगवी यासह इतरही बाजारपेठेत गर्दी होती. मात्र, पावसाने धांदल उडाली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r65893 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..