प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाला धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे
 पर्यावरणाला धोका
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाला धोका

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाला धोका

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ ः चिंचवड - माणिक कॉलनी तानाजी नगरमधील १८ मीटर डीपी रस्त्याचे काम अनेक दिवस बंद पडले आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून एक ड्रेनेज रस्त्याच्या कामामध्ये ठेकेदाराकडून तुटलेले आहे. तरी याकडे महापालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात विविध विभागांशी अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा दखल घेतली जात नाही. संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे परंतु त्याकडे प्रशासनाकडून सक्षम दुर्लक्ष केले जाते. महापालिका व संबंधित विभागांनी याचे काम त्वरित करून द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक नकुल भोईर केली आहे. ते सर्व ड्रेनेजचे मैलापाणी नदीमध्ये जाऊन नदीचे प्रदूषण वाढत आहे. तसेच त्या भोवतालच्या इमारतीमधील लोकांना त्याचा दुर्गंधीचा वास येत आहे. साथीच्या रोगांना आमंत्रण देत आहे. त्यामुळे नागरिक आजारी पडत आहे. महापालिका पर्यावरण रक्षणासाठी जागृतीसाठी अनेक प्रक्रिया राबवते परंतु त्यांच्याकडूनच त्याला हरताळ फासला जात आहे.
फोटो ः 1047

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66016 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..