उद्घाटनाअभावी तारांगण धूळखात खगोल अभ्यासक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्घाटनाअभावी तारांगण धूळखात 
खगोल अभ्यासक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
उद्घाटनाअभावी तारांगण धूळखात खगोल अभ्यासक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

उद्घाटनाअभावी तारांगण धूळखात खगोल अभ्यासक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ ः मुंबई येथील नेहरू तारांगणाच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड शहरात ११ कोटी १३ लाख रुपये खर्च करून सायन्स पार्कच्या आवारात तारांगण बांधण्यात आले आहे. मात्र, उद्घाटनाअभावी तारांगण धूळखात पडले आहे. त्यामुळे खगोल अभ्यासक व विद्यार्थी नाराजी व्यक्त करीत आहेत.
आकाशगंगा, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्य, पृथ्वी यांच्या म्हणजे खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी शहरातील विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा, म्हणून हे तारांगण उभारण्यात आले आहे. ऑटो मेकॅनिकल आणि टू डी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून आकाशातील ग्रह-ताऱ्यांचा अनुभव घेता येईल, अशी व्यवस्था आहे. त्यात १८० आसन क्षमता आहे. १५ मीटर व्यासाचा अर्धगोलाकृती डोम तयार करण्यात आला आहे. या कॅमे-यांच्या माध्यमातून पांढऱ्या शुभ रंगाच्या डोमवर तारे दाखवण्यात येतात. या माध्यमातून प्रत्यक्ष आकाशगंगेत असल्यासारखा अनुभव नागरिकांना येणार आहे. त्यासाठी महापालिकेने ११ कोटी १२ लाख लाखांचा खर्च केला आहे. ते काम जपान टोकियोच्या ठेकेदार कंपनीने केले आहे. मार्च २०१८ ला प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले. कामांची मुदत १० महिने होती. मात्र, कोरोना महामारीमुळे कामास विलंब झाल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. कामास तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली. रडतखडत काम पाच वर्षांनी पूर्ण झाले. दोन महिन्यांपूर्वीच या तारांगणाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. ११ जून रोजी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते मात्र काही कारणास्तव हा दौरा रद्द झाला. त्यानंतर सरकार बदलले. तसेच आयुक्त राजेश पाटील यांची बदली झाली त्यामुळे उद्घाटन रखडले आहे.
कोट
महापालिकेचे तारांगण बांधून तयार झाले आहे. त्याचे उद्घाटन तांत्रिक कारणांमुळे स्थगित झाले. सद्यःस्थितीत महापालिकेत लोकप्रतिनिधी व पदाधिकारी नाहीत. तसेच शहराला पालकमंत्री नसल्याने उद्घाटन नेमके कसे करायचे, असा प्रश्‍न आहे. याबाबत आयुक्त लवकरच निर्णय घेतील. त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
- संजय खाबडे, सहशहर अभियंता विद्युत विभाग महापालिका
91065

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66079 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..