प्रदूषणमुक्त शहरासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदूषणमुक्त शहरासाठी
महापालिकेने पुढाकार घ्यावा
प्रदूषणमुक्त शहरासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा

प्रदूषणमुक्त शहरासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ ः महापालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा झाला. सर्व यंत्रणेने समन्वयाने चांगले काम केले. नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रदूषणमुक्त शहर अभियानाला अधिक बळकटी देण्यासाठी यापुढेही असे उपक्रम सातत्याने राबविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा सोमवारी (ता. १२) झालेल्या जनसंवाद सभांमध्ये नागरिकांनी व्यक्त केली.
नागरिक आणि प्रशासनात सुसंवाद राखावा, तक्रारींचे निवारण जलदगतीने व्हावे, यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा झाली. त्यात ६७ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १४, ८, ४, ८, १०, ४, १३ आणि ६ नागरिकांनी उपस्थित राहून म्हणणे मांडले. उद्यानात अनधिकृतपणे जाहिरात फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी. लहान मुलांसाठी खेळणी बसवावीत. ओपन जिम उभाराव्यात. रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे रात्रीस पथदिवे झाकले जाऊन अंधार पडत असल्याने फांद्यांची छाटणी करावी. सार्वजनिक शौचालयांमधील बंद दिवे सुरू करावेत. शौचालयांची वेळोवेळी सफाई करावी. रस्त्यांवर बेवारस व खासगी वाहने उभी असतात त्यांच्यावर कारवाई करावी. पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा. कचरा उघड्यावर टाकणाऱ्या नागरिकांना दंड करावा. अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करावी. वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमणे काढावीत. रस्त्यावर राडारोडा टाकणारे मालमत्ताधारक व ठेकेदारांवर दंड आकारावा. यामुळे रस्त्यावर राडारोडा टाकण्याचे प्रमाण कमी होईल, अशा सूचना वजा तक्रारी जनसंवाद सभांमध्ये नागरिकांनी मांडल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66147 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..