पालकांनो, मुलांकडे दुर्लक्ष नको ! व्यसनाधीनता, पैशांचा हव्यास, राग ठरतोय घातक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकांनो, मुलांकडे दुर्लक्ष नको ! 

व्यसनाधीनता, पैशांचा हव्यास, राग ठरतोय घातक
पालकांनो, मुलांकडे दुर्लक्ष नको ! व्यसनाधीनता, पैशांचा हव्यास, राग ठरतोय घातक

पालकांनो, मुलांकडे दुर्लक्ष नको ! व्यसनाधीनता, पैशांचा हव्यास, राग ठरतोय घातक

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ : व्यसनाधीनता, पैशांचा हव्यास, प्रेमभंग, वाईट संगत, क्षणिक राग यातून ओठावर मिशाही न फुटलेल्या युवकांची मजल थेट एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत जात आहे. कुटुंबासह समाजसाठीही ही बाब घातक असून, पालकांनी वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
पिंपरीतील आदित्य या सात वर्षीय मुलाच्या खून प्रकरणानंतर शहरात खळबळ उडाली. विविध स्तरातून संताप व्यक्त केला गेला. तसेच यामुळे तरुणांमध्ये वाढत असलेली व्यसनाधीनता, राग व त्यातून ते उचलत असलेले पाऊल हा मुद्दा ऐरणीवर आला. विविध गंभीर गुन्ह्यात युवकांचा सहभाग वाढत आहे. दरम्यान, पालकांनी वेळीच आपल्या मुलांकडे लक्ष दिल्यास अशा घटना रोखता येऊ शकतात. आपली मुले काय करतात, कोणासोबत असतात, त्यांच्या स्वभावातील बदल हे जाणून घ्यायला हवेत. अन्यथा संबंधित मुलांसह त्याच्या कुटुंबावरही पश्चात्तापाची वेळ येते.

* तरुणांमधील का बदलतेय मानसिकता?
- पालकांमधील मतभेद,
- आता तो मोठा झालाय. काय लक्ष द्यायचं? त्याचं त्याला कळतं? ऐकतच नाही..’ असे म्हणून पालकांचे होणारे दुर्लक्ष.
- योग्य वेळी मार्गदर्शन न मिळणे
- प्रेमाचा, आधाराचा, विश्वासाचा अभाव
- नावीन्याची उत्सुकता, करून पाहू, होईल ते बघू नंतर, ही बेजबाबदार वृत्ती
- अति संपन्नता
- हलाखीची परिस्थिती
- व्यसनांची सहज असणारी उपलब्धता.
- भावनिक असुरक्षितता
- एकटेपणा, प्रेमात नकार पचवता न येणे.
---------------------------------------------------------
* उपाय

- परिणामांची जाणीव करून देणे
- मुलांशी संवाद साधणे, योग्य वेळीच मार्गदर्शन करणे किंवा समज देणे.
- सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कुटुंब, सोसायटी येथे आधीच करून ठेवणे.
- मुलांची संगत व वर्तणूक याकडे बारकाईने, जबाबदारी पूर्वक लक्ष देणे.
- मुलांना त्यांच्या विचारांना व्यक्त करण्यास संधी देणे.
------------
* परिणाम

- आक्रमकता, व्यसनाधीनतेमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम होत असते.
- शारीरिक व्याधी जडतात.
- सामाजिक प्रतिमा बिघडते.
- वैयक्तिक, कौटुंबिक नुकसान
---------------
आजची तरुणाई क्रिएटिव्ह, हुशार आहे. त्यांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण कुटूंबातूनच निर्माण व्हायला हवं. घरातील, सोसायटीतील, समाजातील त्यांची वागणूक, त्यांच्या वर्तणुकीतून घडणाऱ्या चांगल्या - वाईट घटनांचे कौतुक किंवा कडक शिक्षा ,शिस्त योग्य मार्गाने वेळच्या वेळी समज देणे अथवा संगोपन व्हायला हवे.
- वंदना मांढरे,
समुपदेशक
------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66150 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..