शहरात तुकटाबंदी विरोधात दोन याचिका दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात तुकटाबंदी विरोधात दोन याचिका दाखल
शहरात तुकटाबंदी विरोधात दोन याचिका दाखल

शहरात तुकटाबंदी विरोधात दोन याचिका दाखल

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ : दस्त नोंदणी संदर्भात नोंदणी नाकारण्याचा अधिकार दुय्यम निबंधक यांना नाही कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याबाबत निकाल दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी कलम ४४ आय रद्द केलेला आहे. तसेच महारान केल्याची अशा दोन याचिका पिंपरी-चिंचवड परिसरातून मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

यामध्ये दुय्यम निबंधक यांच्याकडे दस्त नोंदणीसाठी गेल्यानंतर दस्ताची नोंदणी करण्यात येत नाही; वरीष्ठांचा आम्हाला आदेश आहे, असे सांगितले जाते. पण; या कामी वरिष्ठांचा कोणता लेखी आदेश आहे, हे सांगितले जात नाही. नोंदणी महानिरीक्षक यांनी उच्च न्यायालयामध्ये पुर्नविलोकन याचिका (रिव्हीजन) दाखल केलेली आहे. ही याचिका दाखल असल्यामुळे त्याचा निकाल लागेपर्यंत आम्ही कोणताही दस्त करणार नाही, असेही सांगितले जाते. पुनर्लोकनमध्ये कोणत्याही प्रकारची स्थगिती नाही, असे असताना उच्च न्यायालयाचा अवमान केला जात आहे, असे ॲड. गोरक्षनाथ झोळ यांनी सांगितले. ही सर्व परिस्थिती पाहता दुय्यम निबंधक यांची दस्त नाकारण्यास सहजिल्हा निबंधक व नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य यांच्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून त्यांच्या विरोधात देहरोडचे वकील ॲड. शिवनारायण गोल यांनी याचिका दाखल केली आहे.

‘‘राज्यातील महापालिका अथवा नगरपालिका क्षेत्रात एक अथवा दोन गुठ्यांचे दस्त नाकारणे चुकीचे आहे. त्या ठिकाणी निवासी झोन असल्याने तुकडे बंदीचा कायदा या भागात लागू होत नाही, असे असताना हा दस्त नाकारण्यात येत आहेत. भविष्यातील मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, वैद्यकीय खर्च अशा अनेक कारणांसाठी कामगार, कष्टकरी एक-दोन गुंठ्यात गुतवणूक करतात. त्यांना खर्चाच्यावेळी आता त्यांची जागा विकाता येत नाही. यात सर्वसामान्य भरडला जात आहे. त्यामुळे नांदणी महानिरीक्षकांनी काढलेला अद्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे.’’
- ॲड. गोरक्षनाथ झोळ, माजी अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड बार असोसिएशन

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66207 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..