स्मार्ट सिटी इन्क्युबेशन सेंटरसोबत एचडीएफसी बँकेचा सामंजस्य करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मार्ट सिटी इन्क्युबेशन सेंटरसोबत
एचडीएफसी बँकेचा सामंजस्य करार
स्मार्ट सिटी इन्क्युबेशन सेंटरसोबत एचडीएफसी बँकेचा सामंजस्य करार

स्मार्ट सिटी इन्क्युबेशन सेंटरसोबत एचडीएफसी बँकेचा सामंजस्य करार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ ः स्मार्ट सिटी अंतर्गत स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर आणि एचडीएफसी बँकेचा स्टार्टअप सेल यांच्यात सोमवारी (ता. १२) सामंजस्य करार झाला.
ऑटो क्लस्टरमध्ये झालेल्या बैठकीत एचडीएफसी बँकेकडून रिटेल बँकिंग पश्चिम क्षेत्र प्रमुख अभिषेक देशमुख, रिटेल बँकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष परिमल रमैया यांनी आणि स्टार्टअप इन्क्युबेशनमार्फत स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, संचालक व्यवस्थापक किरण वैद्य यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. एचडीएफसी स्टार्टअप सेलचे अभिषेक श्रीवास्तव, व्यवस्थापक उदय देव, आदित्य मासरे आदी उपस्थित होते. सद्यःस्थितीत स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरमधील हा विसावा सामंजस्य करार आहे. एचडीएफसीने स्थानिक कोसिस्टममधील स्टार्टअपबद्दल समान दृष्टिकोन समाईक केला आहे. त्यामुळे स्टार्टअपला अधिक कार्यक्षमतेने समर्थन देण्यासाठी केलेला करार महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याद्वारे पिंपरी-चिंचवड इनक्युबेशन सेंटरला एचडीएफसी बँक स्टार्टअप संबंधित उपक्रमांमध्ये फायदा मिळवून देण्यासाठी मदत करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66208 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..