पिंपरी महापालिकेत ३८६ पदांसाठी १,०३,६७८ अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC
महापालिकेत जागा ३८६; प्राप्त अर्ज १,०३,६७८

पिंपरी-चिंचवड महापालिकेत ३८६ पदांसाठी १,०३,६७८ अर्ज

पिंपरी - महापालिकेत 'ब' आणि 'क' संवर्गातील ३८६ पदांसाठी सरळसेवा पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी राज्यभरातून अर्ज मागविण्यात आले असून १९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत एक लाख तीन हजार ६७८ जणांनी ऑनलाइन अर्ज केले असून ६४ हजार ४८८ जणांनी परीक्षा शुल्क एक हजार रुपये भरले आहे. ३९ हजार १९० जणांनी अद्याप परीक्षा शुल्क भरलेले नाही.

महापालिकेत थेट पद्धतीने गेल्या दहा वर्षांपासून नोकरभरती झालेली नाही. आता १६ प्रकारच्या पदांच्या ३८६ जागांसाठी सरळसेवा पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. लेखी परीक्षेतीन गुणानुक्रमे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पदांच्या सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय गुणवत्तायादी ठरणार आहे. त्यामुळे तरुणांना थेट महापालिका सेवेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

पदनिहाय रिक्तजागा व प्राप्त अर्ज

पदनाम / रिक्त जागा / प्राप्त अर्ज

 • अतिरिक्त कायदा सल्लागार / १ / १४१

 • कायदा अधिकारी / १ / २१९

 • उपमुख्य अग्निशमन अधिकारी / १ / ९९

 • विभागीय अग्निशमन अधिकारी / १ / १२२

 • उद्यान अधीक्षक वृक्ष / १ / ३२४

 • सहायक उद्यान अधीक्षक / २ / २९६

 • सहायक उद्यान अधीक्षक / २ / २९६

 • हॉर्टिकल्चर सुपरवायझर / ८ / ६६९

 • न्यायालयीन लिपिक / २ / ३४८

 • प्राणी रक्षक / २ / २१२

 • समाजसेवक / ३ / २०६५

 • स्थापत्य अभियांत्रिकी सहायक / ४१ / १३,८४५

 • लिपिक / २१३ / ३८,८९३

 • आरोग्य निरीक्षक / १३ / २८२९

 • उद्यान निरीक्षक / ४ / ४८१

 • कनिष्ठ अभियंता स्थापत्य / ७५ / ३५,९८२

 • कनिष्ठ अभियंता विद्युत /१८ / ५,७४४

 • एकूण / ३८६ / १,०३,६७८

(टीप - आठ सप्टेंबरपर्यंत प्राप्त अर्जांची संख्या असून १९ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66332 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..