मारून टाकण्याची धमकी दिल्याने चालकाने मारली रिक्षातून उडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
मारून टाकण्याची धमकी दिल्याने चालकाने मारली रिक्षातून उडी

मारून टाकण्याची धमकी दिल्याने चालकाने मारली रिक्षातून उडी

पिंपरी - रुग्णालयात जाण्याच्या बहाण्याने रिक्षात बसलेल्या दोघांनी रिक्षाचालकाला मारहाण केली. मारून टाकण्याची धमकी दिल्याने चालकाने रिक्षातून उडी घेतली. त्यानंतर आरोपी रिक्षासह मोबाईल घेऊन पसार झाले. हा प्रकार पिंपळे गुरव येथे घडला.

याप्रकरणी संदीप दिलीप थोरात (रा. भारत माता चौक, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे रिक्षाचालक असून ते रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कासारवाडी रेल्वे स्थानकावरून त्यांच्या घरी मोशी येथे जात होते. दरम्यान, आरोपींनी हात दाखवून रिक्षा थांबवली. वायसीएम हॉस्पिटल येथे जायचे असल्याचे सांगून जेवणाचा डबा आणण्यासाठी पिंपळे गुरव येथे जायचे असल्याचे सांगितले. आरोपी रिक्षात बसून पिंपळे गुरव येथील ओंकार कॉलनीत आले. तेथे फिर्यादीला मारहाण करून रिक्षाच्या मागील सीटवर बसवले. नर्मदा रोडने जात असताना पुन्हा त्यांना मारहाण करून ‘तू आमचे ऐकत नसशील तर तुला येथे मारून टाकू’ अशी धमकी दिली. यामुळे फिर्यादी यांनी रिक्षातून उडी मारली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीची रिक्षा, दोन हजारांचा मोबाईल व पाकीट असा एकूण ५२ हजारांचा ऐवज लुटला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22s91878 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..