तळेगाव-ओवळे एसटी बससेवा पूर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव-ओवळे एसटी बससेवा पूर्ववत
तळेगाव-ओवळे एसटी बससेवा पूर्ववत

तळेगाव-ओवळे एसटी बससेवा पूर्ववत

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १३ ः तळेगाव-ओवळे एसटी बस सुरू झाल्याने पवनमावळाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रवासाचा प्रश्न सुटला आहे. गेले दोन वर्ष कोरोनामुळे शाळा व एसटी बस बंद होत्या. कोरोनाचे संकट कमी झाल्याने यावर्षी शाळा नियमित सुरू झाल्या तरीही पवनमावळाच्या ग्रामीण भागातील तळेगाव ते ओवळे बस सेवा सुरू झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती.
ही समस्या सोडवण्यासाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी राज्य परिवहन महामंडळाशी संपर्क साधून तळेगाव ते ओवळे एसटी बस पूर्ववत सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून ही एसटी बस सेवा सुरू झाली. त्यामुळे पाचाणे, पुसाणे, ओवळे, दिवड, राजेवाडी, आढले येथील विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न सुटला आहे.
--------------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22t07004 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..