चिंतामणी प्रशालेत उद्यापासून उद्योजकता विकास प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंतामणी प्रशालेत उद्यापासून
उद्योजकता विकास प्रशिक्षण
चिंतामणी प्रशालेत उद्यापासून उद्योजकता विकास प्रशिक्षण

चिंतामणी प्रशालेत उद्यापासून उद्योजकता विकास प्रशिक्षण

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ ः आयडिअल इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आणि राज्य सरकारचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यातर्फे चिंचवड स्टेशन येथील चिंतामणी रात्र प्रशालेत स्वयंरोजगार व उद्योजकता विकास परिचय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. गुरुवार (ता. १५) व शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत प्रशिक्षण होईल.
खादी ग्रामोद्योग, जिल्हा उद्योग केंद्र, रोजगार व स्वयंरोजगार विभागातील अधिकारी स्वयंरोजगार व उद्योजकता विकास परिचय प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतील. तसेच, राष्ट्रीयकृत व सहकारी बॅंकांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या होईल. प्रशिक्षणासाठी विनामूल्य प्रवेश आहे, असे आयडीयलचे अध्यक्ष गोविंद पानसरे यांनी सांगितले. प्रशिक्षण कार्यक्रमात चिंतामणी रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांसह अठरा वर्षांवरील व्यक्ती सहभागी होऊ शकतात. व्यवसाय कसा निवडायचा?, त्यासाठी अर्थपुरवठा कसा होतो?, कर्ज मागणी प्रक्रिया काय आहे?, व्यवसाय व्यवस्थापन कसे करायचे?, विक्री किंवा वितरण कौशल्य, त्याचे व्यवस्थापन आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे प्राचार्य दिलीप लंके यांनी सांगितले.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22t33058 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..