लम्पी आजारग्रस्त जनावरांच्या मांसाची विक्री? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पी आजारग्रस्त जनावरांच्या मांसाची विक्री?
लम्पी आजारग्रस्त जनावरांच्या मांसाची विक्री?

लम्पी आजारग्रस्त जनावरांच्या मांसाची विक्री?

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : लम्पी स्कीन या आजाराने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसाय संकटात आलेला असतानाच या आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांच्या मांसाची अवैध विक्री पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी, मोशी, निगडी ओटास्कीम या भागासह देहूरोड परिसरात सर्रास होत आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी लम्पी आजार जाईपर्यंत महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांनी म्हशीच्या मांसाची विक्री बंद करावी, अशी मागणी केली आहे.
लम्पी स्कीन या रोगाने आजारी असलेल्या जनावरांचे मांस असे अवैधरीत्या विक्री करणे धोकादायक असल्याने याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यात गोवंश मांस विक्रीला कायद्यानेच बंदी आहे. परंतु; म्हशीच्या मांस विक्रीला परवानगी आहे. त्यामुळे सरकारच्या सरकारच्या अधिकृत खडकी कॅन्टोन्मेंट व कोंढवा येथील कत्तलखान्यात म्हशीच्या मांसाची रीतसर कत्तल करून नंतर विक्री केली जाते. परंतु; पिंपरीतील भाजी मंडई जवळील इंदिरा गांधी पुलाखाली दुकानांमध्ये नावाला दहा टक्के म्हशीचे मांस ठेऊन अवैधरीत्या गाय, बैलांचे मांस विक्री सर्रास होते. त्याचप्रमाणे शहरात निगडी ओटास्कीम, मोशी व देहूरोड या भागातही अशाच प्रकारे अवैध विक्री होते. पोलिस अशा अवैध मांस विक्रीवर कारवाई करतात. परंतु; त्यांची दिशाभूल केली जाते. अशा प्रकारचे अवैध मांस अहमदनगर, सोलापूर, इंदापूर या भागातून आणले जात आहे.

‘‘जनावरांना वाहनातून प्रवासालाही बंदी आहे. परंतु सर्व कायदे धाब्यावर ठेवून अवैधरीत्या अशी विक्री होत असते. लम्पी आजार असेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी व पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी म्हशीच्या मांस विक्रीलाही बंदी घालावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत.
- शिवशंकर स्वामी, मानद पशू कल्याण अधिकारी

‘‘लम्पी आजाराची जनावरे पिंपरी-चिंचवड परिसरात असल्याची तक्रार नाही. लम्पी आजाराने ग्रस्त जनावरांचे मांस विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यावर पोलिस कारवाई करतात.’’
- डॉ. अरुण दगडे, पशू वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.

‘‘लम्पी आजाराच्या जनावरांची मांस विक्री होते, ही अफवा आहे. सरकारच्या कत्तलखान्यात पशू वैद्यकीय अधिकारी अगोदर जनावरांची तपासणी करतात. जनावर योग्य असेल तरच त्याची कत्तल होते. आता लम्पी आजाराचा ग्रामीण भागात प्रादुर्भाव असल्याने खडकी कॅंन्टॉन्मेंटच्या कत्तलखान्यातील पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना भोर येथे तात्पुरती नियुक्ती केली आहे. त्यामुळे खडकीत परवापासून कत्तलखाना बंद राहणार आहे.’’
- एक मांस विक्रेता (नाव न सांगण्याच्या अटीवर)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22t66026 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..