दिघीत सावत्र भावासह टोळक्याकडून कुटुंबीयांना मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिघीत सावत्र भावासह 
टोळक्याकडून कुटुंबीयांना मारहाण
दिघीत सावत्र भावासह टोळक्याकडून कुटुंबीयांना मारहाण

दिघीत सावत्र भावासह टोळक्याकडून कुटुंबीयांना मारहाण

sakal_logo
By

पिंपरी : घरगुती वादातून सावत्र भावासह टोळक्याने कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना दिघीत घडली. या प्रकरणी प्रमोद शिवाजी कोळेकर (रा. समर्थनगर, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद कोळेकर (वय ३२, रा. समर्थनगर, दिघी), सूरज पाटोळे (वय ३०, रा.मुंबई) व सूरजचे चार मित्र यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांची सावत्र आई सुनंदा कोळेकर यांनी फिर्यादीचा सावत्र भाऊ प्रसाद याच्याशी झालेला वाद मिटविण्यासाठी त्यांच्या परिसरातील मनोज गायकवाड यांना सोमवारी सकाळी घरासमोर बोलविले. त्यावेळी कालच्या भांडणाचा राग मनात धरून सूरज पाटोळे याने मनोज यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर मारहाण केली. फिर्यादीचा भाऊ विजय यांच्याही डोक्यात मारून त्यांना जखमी केले. सूरजच्या मित्रांनीही फिर्यादीला हाताने मारहाण केली. आरोपी प्रसाद याने विजयच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. दरम्यान, फिर्यादी यांची आई मंगल या बाहेर आल्या असता सूरजच्या मित्राने त्यांच्या डोक्यात फळी मारली. या भांडणात फिर्यादीच्या आईचे सोन्याचे मंगळसूत्र गहाळ झाले. फिर्यादीमध्ये गेले असता सूरजने त्यांना मारहाण केली. तर सुरजच्या मित्रांनी फिर्यादीच्या वडिलांना मारहाण केली. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक
बनावट कागदपत्रे तयार फसवणूक केल्याप्रकरणी शशांक बळवंत हाटे (वय ४१, रा. रास्ता पेठ, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दापोडीतील उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर सहा कार्यालय येथे घडला. या प्रकरणी संतोष तुकाराम शिंगाडे (रा. भीमाशंकर कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हा उपनिबंधक कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहे. दरम्यान, आरोपीने फिर्यादीच्या कार्यालयाचे तत्कालीन प्रमुख उपनिबंधक ए. टी. साकोरे यांच्या बनावट स्वाक्षरीच्या कंत्राटी ग्रामसेवक भरतीचा बनावट आदेश, शिपाई पदाचा रुजू अहवाल व प्रमाणपत्र ही बनावट कागदपत्रे तयार केली. ती खरी असल्याची भासवले. ही कागदपत्रे नितीन रायरकर यांना देऊन त्याने फिर्यादीच्या कार्यालयाची तसेच सरकारची फसवणूक केली.

गाईला गुंगीचे इंजेक्शन देऊन केले बेशुद्ध
रस्त्यावर फिरणाऱ्या गाईला गुंगीकारक औषधी इंजेक्शन देत बेशुद्ध करून घेऊन गेल्याप्रकरणी अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दिघी-आळंदी रोडवरील सत्यनारायण सोसायटीसमोर घडला. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमांतर्गत भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22u01819 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..