पथविक्रेता बायोमेट्रिक ३० सप्टेंबरपर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथविक्रेता बायोमेट्रिक
३० सप्टेंबरपर्यंत मुदत
पथविक्रेता बायोमेट्रिक ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

पथविक्रेता बायोमेट्रिक ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ ः बायोमेट्रिक नोंदणीसाठी शहरातील पात्र पथविक्रेत्यांची नोंदणी प्रक्रियेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली. महापालिकेने २०१४ मध्ये शहरातील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यात पात्र ठरलेल्या पथविक्रेत्यांची पूर्वी बायोमेट्रिक नोंदणी केली होती. मात्र, काहींचे बायोमेट्रिक नोंदणीचे काम शिल्लक आहे. त्यांच्या नोंदणीसाठी २५ जुलै ते ३० ऑगस्टपर्यंत संधी होती. तरीही काही पात्र फेरीवाल्यांची नोंदणी मुदतीत पूर्ण झाली नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत बायोमेट्रीक नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. पात्र पथविक्रेत्यांनी आपल्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयात आवश्यक कागदपत्रे आणि आधारकार्डसह सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ या कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस सोडून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी केले आहे.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22v55317 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..