राज्यातील ३३८ गरीब विद्यार्थ्यांना ‘सीआई इंडिया’ संस्थेने मिळवून दिला रोजगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CIE
राज्यातील ३३८ गरीब विद्यार्थ्यांना ‘सीआई इंडिया’ संस्थेने मिळवून दिला रोजगार

राज्यातील ३३८ गरीब विद्यार्थ्यांना ‘सीआई इंडिया’ संस्थेने मिळवून दिला रोजगार

पिंपरी - महिंद्रा कंपनीच्या भोसरी येथील सीआई इंडिया इन्सिस्टट्यूट ऑफ स्किल्स या संस्थेने कोरोनाच्या कठीण काळातील दीड वर्षात राज्यातील सुमारे ४५० गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना किमान कौशल्याचे मोफत शिक्षण देवून, त्यापैकी ३३८ जणांना नोकरीही मिळवून दिली.

कंपन्यांना सामाजिक उपक्रमासाठी मिळालेल्या नफ्यातून २ टक्के खर्च करणे ‘सीएसआर’ कायद्याने सक्तीचे असले तरी मनापासून सामाजिक उपक्रम राबविण्याचा ध्यास, वसा घेतल्यानंतर खरोखरच त्याची फलनिष्पत्तीही चांगलीच होते. याचा प्रत्यय महिंद्रा कंपनीच्या सीआई इंडिया इंस्टिट्यूट ऑफ स्किल्स या संस्थेच्या कोरोनकाळातील गेल्या दीड वर्षातील कामाचा आढावा घेतल्यानंतर येतो. ‘महिंद्रा सीआयई’ हा सीएसआर अंतर्गतचा प्रकल्प लर्नेट स्किल्स फॉर लाईफ यांच्या मार्फत राबविला जातो. ही संस्था नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन या संस्थेशी सलग्न आहे.

महिंद्रा कंपनीने भोसरीत सीआयई ही संस्था स्थापन केली. नेमका तो कोरोनाचा कठीण काळ होता. तरीही या संस्थेने न डगमगता हा सामाजिक उपक्रम नेटाने पुढे नेला. संस्थेने १) हायड्रॉलिक आणि न्युमॅटिक फिटर हा ५०० तासांचा (२१ दिवसांचा), २) सी. एन. सी. ऑपरेटर- टर्निंग हा ५४० तासांचा (२३ दिवसांचा), ३) इंडस्ट्रिअल वेल्डर हा ६५० तासांचा (२७ दिवसांचा) असे तीन कोर्स सुरु केले. या कोर्समध्ये दररोज ८ तास शिकविले जाते. एका वर्गाला ३० विद्यार्थी निवडले जातात.

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित शिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिल्यानंतर मोफत रोजगाराची संधी (प्लेसमेंट) दिली जाते. महिंद्रा कंपनीचे अधिकारी सुरवातीस विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतात. यापैकी जवळपास २५ टक्के विद्यार्थ्यांना महिंद्राच्या पुणे विभागातील ७ कंपन्यांमध्ये रोजगार दिला जातो. ३ कोर्सच्या आत्तापर्यंत ५ बॅचेस बाहेर पडल्या आहेत. यामध्ये ६५ मुलीही प्रशिक्षण घेऊन गेल्या आहेत.

प्रवेश पात्रता कशी ?

- गरजवंत विद्यार्थी असणे ही पहिली पात्रता

- फिटर व टर्निंगसाठी १० वी पास

- वेल्डरसाठी ८ वी पास

- वयाची मर्यादा १८ ते ३५ वर्षे

- विद्यार्थी दहावी नापास असला तरी संधी

आवश्‍यक कागदपत्रे

- आधार कार्ड

- शैक्षणिक प्रमाणपत्र

- शिधा पत्रिका (रेशन कार्ड)

- परसपोर्ट साईज फोटो

मोफत प्रशिक्षणाची संधी!

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्‍चिम महाराष्ट्र अशा कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत मोफत किमान कौशल्य प्रशिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सुरक्षा उपकरणेही कंपनी मोफत देते.

व्यक्तिमत्त्व विकासही...

- इंग्लिश स्पिकींग

- संगणक प्रशिक्षण

- व्यक्तिमत्त्व विकास

महिंद्रा कंपनीच्या या उपक्रमांतर्गत पूर्वी आयएलएफएस स्किल्स या नावाने सुमारे २० वर्षे किमान कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. हा उपक्रम सीएसआर अंतर्गत डिसेंबर २०२० मध्ये सुरु केला. महिंद्रा कंपनीचे माजी संचालक दलजित मिरचंदानी यांच्या संकल्पनेतून महिंद्र सीआई व लर्नेट यांनी एकत्र येऊन ‘लक्ष’ उपक्रम राबविला आहे. अशाच प्रकारे लर्नेटद्वारे मुंबई कोलगेट कंपनीसोबत ७५० मुलांना प्रशिक्षण देवून नोकरी लावली आहे.

- ऋषिकेश शेडगे, प्रकल्प व्यवस्थापक, लर्नेट स्किल फॉर लाईफ.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11108 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top