
चिखलीत दोन टोळक्यात राडा
पिंपरी, ता. १७ : भाईगिरी व जुन्या भांडणावरून चिखलीत दोन टोळक्यात रविवारी(ता. १२) बाराच्या सुमारास राडा झाला. याप्रकरणी सोमवारी रात्री परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले.
राहुल रमेश मेड्डी (रा. शास्त्रीनगर, कासारवाडी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गणेश चंद्रकांत सिंगुलकर (वय २१, रा. बालघरेवस्ती, कुदळवाडी, चिखली) याला अटक केली. तर कमलेश क्षीरसागर, दानेश, आदित्य पुजारी, सिराज अन्सारी, बाजीराव मिसाळ, अक्षय शेडगे (रा. कासारवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी हा मित्र गणेश पवार याच्या सोबत जात होता. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणातून गणेश पवारच्या हातावर रॉड मारला. हे भांडण सोडविण्यासाठी गेल्यावर फिर्यादीवर वार करून प्राणघातक हल्ला केला.
गणेश चंद्रकांत सिंगुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेश पवार, नन्या पवार, वृषभ मांडके, घनशाम यादव ऊर्फ बंटा, राहुल मेड्डी, ओंकार आंग्रे (सर्व रा. कुदळवाडी, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. दाणेश, कमलेश व गणेश यांच्यात वादावादी व हाणामारी झाली. त्यावेळी गणेश पवारने त्याच्या साथीदारांना बोलविले. गणेशने फिर्यादीवर चाकूने वार केला. इतर आरोपींनी फिर्यादीच्या रिक्षावर दगड मारून नुकसान केले. कमलेश याच्या घराच्या दरवाज्यावर व गाडीवर कोयते मारून नुकसान केले. हा प्रकार चिखलीतील पवार वस्ती, बालघरे वस्ती येथे घडला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11231 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..